सुपौल: प्रेमाला ना सीमा असते, ना बंधने (Viral News) हे विधान पुन्हा एकदा बिहारमधील एका घटनेने सिद्ध केले आहे. सोशल मीडियाच्या युगात जिथे ओळखी क्षणिक असतात, तिथे इन्स्टाग्रामवर सुरू झालेली दोन तरुणींनी थेट विवाह केला आहे. २१ वर्षीय पूजा आणि १८ वर्षीय आरती यांनी जगाची पर्वा न करता एकमेकींच्या गळ्यात वरमाला घालून नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

अनोख्या प्रेमकहाणीची सुरुवात दोन वर्षांपूर्वी ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली. सुरुवातीला चॅटिंग आणि नंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पूजा आणि आरती एकमेकींच्या जवळ आल्या. मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी सोबत जगण्याचा निर्णय घेतला. बिहारसारख्या ग्रामीण भागात समलैंगिक विवाहाला आजही सामाजिक मान्यता मिळणे कठीण आहे, हे माहीत असूनही या दोघींनी मागे न हटण्याचा निर्णय घेतला.
मंदिरात गॅस पेटवून घेतले सात फेरे
या लग्नातील चर्चेचा विषय म्हणजे दोघींनी स्थानिक मंदिरात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिथे लग्न विधीसाठी अग्निकुंड नव्हते. अशावेळी मागे न सरकता त्यांनी चक्क गॅस पेटवला आणि अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेत विवाह केला.







