हरियाणा: हरियाणातील गुरुग्राम येथे 19 वर्षीय तरुणीवर (Shocking News) तिच्या लिव्ह-इन पार्टनरकडून झालेल्या अमानुष छळाच्या प्रकरणाने देशभरात संताप व्यक्त होत आहे. पीडित तरुणी बी.एस्सी.ची विद्यार्थिनी असून तिची आई त्रिपुरामध्ये पोलिस अधिकारी आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपी शिवमने तिच्यावर (Crime News) वारंवार शारीरिक अत्याचार केले, मारहाण केली आणि तिच्या गुप्तांगांवर सॅनिटायझर ओतून लाईटरने आग लावल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकाराचे चित्रीकरणही त्याने केल्याचे समोर आले आहे. (Hariyana News)

तरुणीला गंभीर अवस्थेत दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या आईच्या म्हणण्यानुसार, मुलीला तीन दिवस खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. तिला अमानुष वागणूक देत लघवी पिण्यास भाग पाडले, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू आहे.
पीडित तरुणी मूळची त्रिपुराची असून ती गुरुग्राममध्ये पीजीमध्ये राहत होती आणि जीडी गोएंका विद्यापीठात शिक्षण घेत होती. तिची ओळख शिवमशी ऑनलाइन मोबाईल अॅपद्वारे झाली. सप्टेंबर 2025 पासून दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि नंतर ते एकत्र राहू लागले. लग्नाचे आश्वासन देत आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत सतत मारहाण आणि धमक्या देण्यास सुरुवात केली.
तपासात आरोपीने चाकूने वार केल्याचे, डोक्यावर स्टीलच्या बाटलीने प्रहार केल्याचे आणि नग्न अवस्थेत व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही उघड झाले आहे. या घटनेमुळे लिव्ह-इन नातेसंबंधांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तरुणींच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबीयांशी संवाद, विश्वासार्ह नातेसंबंध आणि संशयास्पद वर्तनाची तातडीने माहिती देणे किती महत्त्वाचे आहे, हे या प्रकरणातून अधोरेखित होते. पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.






