बेंगळुरू: संपत्तीच्या लोभापायी (Shocking News) माणूस किती टोकाला जाऊ (Crime News) शकतो, याचं धक्कादायक उदाहरण बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यात समोर आलं आहे. संपत्ती (Bengluru News) मिळवण्यासाठी एका जोडप्याने आपल्या दत्तक घेतलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ही घटना होसाकोट तालुक्यातील सुलिबेले येथील जनता कॉलनीमध्ये घडली असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सय्यद इम्रान आणि त्याच्या पत्नीने घरातील एका खोलीत खड्डा खणून बाळाच्या बळीची तयारी सुरू केली होती. शनिवारी पौर्णिमेच्या दिवशी बाल संरक्षण हेल्पलाइनवर एक निनावी फोन आला. या कॉलमध्ये एका घरात बाळाचा नरबळी देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. या माहितीनंतर बाल संरक्षण युनिटच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत संबंधित घरावर छापा टाकला.
छापा टाकल्यानंतर घरातील एका खोलीत खड्डा खणलेला असून बळीची तयारी झाल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत त्या आठ महिन्यांच्या बाळाची सुटका केली. बाळाला सुरक्षिततेच्या दृष्टीने बाल संगोपन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सुलिबेले पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
तपासात असे समोर आले आहे की, सय्यद इम्रानने सुमारे 8 महिन्यांपूर्वी एका स्थलांतरित कामगाराकडून हे बाळ दत्तक घेतले होते. दत्तक घेतल्यानंतर आरोपी दाम्पत्याने बाळाच्या नावाने बनावट जन्म प्रमाणपत्रही तयार करून घेतले होते. छाप्याच्या वेळी आरोपींनी अधिकाऱ्यांना दत्तक घेण्याचा हेतू दर्शविणारे पत्र आणि करार दाखवला. मात्र, ही दत्तक प्रक्रिया कायदेशीर नसल्याने अधिकाऱ्यांनी बाळाला ताब्यात घेतले.
या प्रकरणात बाल संरक्षण आणि बाल कल्याण समितीने गंभीर दखल घेतली असून नरबळीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. पोलिस पुढील कारवाई करत असून आरोपींविरोधात कठोर कायदेशीर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.







