Ram Sutar Passes Away: महाराष्ट्र: आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असलेले आणि जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाल्याची दुखद बातमी समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 101 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले असून आज सकाळी 11 वाजता गुरुग्राम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने देशाने एक महान कलाकार गमावला आहे.

राम सुतार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नाही तर जगभरात 200 हून अधिक शिल्पे साकारली. सुमारे 60 वर्षांच्या कामगिरीत त्यांनी भव्य आणि प्रेरणादायी पुतळे उभारत शिल्पकलेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
दिल्लीतील संसद भवन परिसरात राम सुतार यांनी घडवलेली शिल्पे आजही पाहायला मिळतात. तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पुतळे त्यांनी घडवले. याशिवाय महात्मा गांधी यांचे अनेक पुतळे त्यांनी परदेशात उभारले असून ते आजही भारताची ओळख जगासमोर मांडतात.
राम सुतार यांचा जन्म महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंदूर या छोट्या गावात 1925 मध्ये झाला. अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. त्यांच्या गुरूंनी त्यांच्यातील कला ओळखून त्यांना मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे 1950 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे अजिंठा लेण्यांच्या पुनर्जतनाचे काम त्यांना मिळाले. मात्र शिल्पकलेची ओढ असल्याने त्यांनी नोकरी सोडून स्वतंत्रपणे शिल्पकलेचे काम सुरू केले.
राम सुतार यांनी अनेक ऐतिहासिक आणि भव्य शिल्पांची निर्मिती केली आहे. त्यातील काही प्रमुख शिल्पे पुढीलप्रमाणे:
-
-
स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पटेल) – गुजरात, जगातील सर्वात उंच पुतळा
-
स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी (रामानुजाचार्य) – हैदराबाद
-
छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे – महाराष्ट्रातील विविध ठिकाणी
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे – देशभरात विविध ठिकाणी
-
महात्मा गांधी यांचे पुतळे – भारत व परदेशात
-
इंदिरा गांधी यांचा पुतळा – संसद भवन परिसर, नवी दिल्ली
-
संभाजी महाराजांचा पुतळा – पुणे शहरात
-
यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा – महाराष्ट्रात
-
पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित महान शिल्पकार राम सुतार यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्त अत्यंत दुखःद आहे. वयाच्या शंभराव्या वर्षीही ते आपल्या कलेशी समर्पित होते. त्यांच्या जाण्याने भारतीय शिल्पकला क्षेत्राचं मोठं नुकसान… pic.twitter.com/Ctq8KXGV9t
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 18, 2025
त्यांच्या कामाचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही केले होते. इंग्लंड, इटली, फ्रान्स, रशिया यांसारख्या अनेक देशांमध्ये त्यांच्या हातून साकारलेले पुतळे उभे आहेत. एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास राम सुतार यांनी आपल्या मेहनतीने आणि कलेने संपूर्ण जगात पोहोचवला.




