नवी दिल्ली: जगातील विविध देशांशी भारताचे राजनैतिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी ‘संसदीय मैत्री गट’ स्थापन केला आहे. या उपक्रमांतर्गत सत्ताधारी पक्षांसह इंडिया आघाडीतील प्रमुख खासदारांनाही प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

या योजनेनुसार एकूण 23 वेगवेगळे संसदीय गट तयार करण्यात आले असून, प्रत्येक गटाला विशिष्ट देशाची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित देशांशी संसदीय पातळीवर संवाद वाढवणे, सहकार्याच्या नव्या संधी शोधणे आणि परस्पर संबंधांना चालना देणे हा या गटांचा उद्देश आहे.
विविध देशांसाठी नेतृत्वाची जबाबदारी
काही वरिष्ठ तसेच अनुभवी खासदारांकडे या गटांचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्यानुसार
सुप्रिया सुळे – सिंगापूर
प्रफुल्ल पटेल – ब्राझील
श्रीकांत शिंदे – इंडोनेशिया
अशोक चव्हाण – अर्जेंटिना
अरविंद सावंत – मोरोको
नरेश म्हस्के आणि संजय राऊत – केनिया
रवींद्र वायकर – चिली
वर्षा गायकवाड – श्रीरंग बारणे – बाल्टिक देश
शशी थरूर – फ्रान्स
पी. चिदंबरम – इटली
के. सी. वेणुगोपाल – पोर्तुगाल
मनीष तिवारी – ऑस्ट्रेलिया
गौरव गोगोई – फिलिपिन्स
कनिमोळी – ग्रीस
अखिलेश यादव – जपान
राम गोपाल यादव – इजिप्त
संजय सिंग – कॅरिबियन देश
एन. के. प्रेमचंद्रन – मादागास्कर
असदुद्दीन ओवेसी – ओमान
डेरेक ओ’ब्रायन – अभिषेक बॅनर्जी – अल्जेरिया
या गटांद्वारे संसदीय प्रतिनिधी संबंधित देशांना भेट देऊन द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये संवाद वाढवतील. विशेष म्हणजे, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांना समान संधी देण्यात आल्याने या उपक्रमाला सर्वपक्षीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
संसदीय कूटनीतीला चालना देत भारताची जागतिक उपस्थिती अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.







