Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ग्राहक मंचला अटक वॉरंट काढण्याचा अधिकार नाही; कोलकाता हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 8 April 2025, 15:32
Consumer Forums Not Legally Authorised To Issue Arrest Warrants: Calcutta High Court

कोलकाता: ग्राहक मंचला आपल्याकडे आलेल्या कोणत्याही प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्याचा अधिकार नाही. ग्राहक मंच फक्त ताब्यात घेण्याचे आदेश देऊ शकतात, असा महत्त्वाचा निर्वाळा कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. तसेच संबंधित प्रकरणात याचिकाकर्त्यांविरोधात जारी अटक वॉरंट रद्द केले. जिल्हा ग्राहक मंचने जारी केलेल्या अटक वॉरंटला कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती शुभ्रा घोष यांनी ग्राहक मंचला अटक वॉरंट जारी करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकारची कारवाई ग्राहक संरक्षण कायद्याच्या चौकटीबाहेर आहे, असे न्यायमूर्तीनी म्हटले. हे प्रकरण २०१३ साली टॅक्टर खरेदीसंदर्भातील एक आर्थिक कंपनी आणि कर्जदार यांच्यातील वादाशी संबंधित आहे.

 

कर्जदाराने कंपनीचे २५,७१६ रुपये थकित ठेवले होते. त्यामुळे कंपनीने त्याचे ट्रॅक्टर जप्त केले. यामुळे कर्जदाराने ग्राहक मंचकडे धाव घेत कंपनीला ट्रॅक्टर ताब्यात देण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली होती. यानंतर ग्राहक मंचने कर्जदाराकडून २५,७१६ रुपयांची थकित रक्कम मिळाल्यानंतर ट्रॅक्टर नोंदणी प्रमाणपत्र त्याला देण्याचे आदेश दिले होते. यादरम्यान कंपनीने देखील एक प्रकरण दाखल केल्याने ग्राहक मंचने १३ डिसेंबर २०१९ रोजी याचिकाकर्त्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. परंतु न्यायमूर्ती घोष यांनी ग्राहक मंचला कोणत्याही प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करत याचिकाकर्त्याला दिलासा दिला. दिवाणी प्रक्रिया संहितेंतर्गत फक्त ताब्यात ठेवण्यासाठी आदेश देण्याची मुभा ग्राहक मंचला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

पिंपरीत तब्बल 1 लाख 30 हजार थकबाकीदार, 435 काेटी रुपये मालमत्ता कर अद्यापही थकीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.