नवी दिल्ली : नवी दिल्ली मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. संसदेच्या आजी-माजी खासदारांचे वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांचं वेतन 24 टक्क्यांनी वाढले आहे.

खासदारांचं पूर्वीचं आणि आताचं वेतन:
खासदारांचं दरमहा वेतन किती असणार?
पूर्वी: ₹1,00,000 रुपये
आता: ₹1,24,000 रुपये
संसद सत्रादरम्यान संसदेत हजर राहिल्यास दैनिक भत्ता दिला जातो
पूर्वी: ₹2,000 रुपये प्रति दिवस
आत्ता: ₹2,500 रुपये प्रति दिवस
माजी खासदाराचे दरमहा वेतन
पूर्वी: ₹25,000 रुपये
आता: ₹31,000 रुपये
अतिरिक्त पेंशन
पूर्वी: ₹2,000 रुपये महिना
आता: ₹2,500 रुपये महिना
टिकाऊ फर्निचर
पूर्वी: ₹ 80 हजार रुपये प्रत्येक महिन्यास
आता: ₹1 लाख रुपये प्रति महीना
गैरटिकाऊ फर्निचर
पूर्वी: ₹ 20 हजार प्रति महीना
आता: ₹ 25 हजार प्रति महीना
या अगोदर एप्रिल 2018 मध्ये संसदेतील खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता वेतन वाढीच्या अधिसूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. ही पगार वाढ करताना महागाई निर्देशांक विचारात घेतला जातो. त्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाने, 1 एप्रिल 2023 ची भाववाढ लक्षात घेता ही वाढ करण्यात आली आहे.
खासदारांना कोणत्या सुविधा मिळतात?
– मोफत इंटरनेट आणि फोन सुविधा.
– दरवर्षी 34 वेळा देशांतर्गत विमान प्रवास.
– फर्स्ट क्लासमध्ये कोणत्याही वेळी मोफत रेल्वे प्रवास.
– रस्ते प्रवासासाठी इंधन खर्च भरपाई मिळते.
– दरवर्षी 50 हजार युनिट वीज आणि 4 हजार किलोलीटर पाणी मोफत.
– खासदारांना मतदारसंघातील खर्चासाठी प्रतिमहा 70 हजार रुपये मिळतात.
– कार्यालयीन भत्ता 60 हजार रुपये मिळतो
– दिल्ली मध्ये सरकारी निवासस्थान मिळते
– मोफत आरोग्य सेवा मिळतात
– संसदेत कॅन्टीनमध्ये अल्पदरात जेवण मिळते







