Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश, अधिकृत पत्र प्रसिद्ध

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 30 January 2024, 19:56
Vanchit Bahujan Aghadi included in mahavikas aghadi mumbai

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचा औपचारिकरित्या महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे महाविकास आघाडीने अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे. काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याच्या उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. गेल्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मानापमान नाट्यही रंगलं होते. त्यानंतर मंगळवारी वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर तासभर बसवल्याने महाविकास आघाडीने अपमान केल्याचा आरोपही वंचिततर्फे करण्यात आला होता. मात्र, अखेर आज वंचितला महाविकास आघाडीत समावेश करत असल्याचे पत्र दिले आहे.

 

मंगळवारी झालेल्या मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचं या पत्रात म्हटले आहे.

महाविकास आघाडीची पुढची बैठक ही 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी वंचितच्या वतीने प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर हे स्वतः त्यासाठी हजर राहणार आहेत. दरम्यान वंचितला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला अद्याप अधिकृत पत्र प्राप्त झाले नाही, ते मिळाल्यावर भूमिका मांडू, असे त्यांनी म्हटले.

मुंबईतील बैठकीत वंचित महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. प्रकाश आंबेडकरांनी बैठकीचे आमंत्रण आल्याचे जाहीर केले होते. वंचितच्या वतीने बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. त्यांच्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, विनायक राऊत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल देशमुख आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोलेंसह वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

मा. @Prksh_Ambedkar जी, pic.twitter.com/jCa5PFqWdj

— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 30, 2024

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37

भोंदू ऋषिकेश वैद्यचं कोठडीतही “भक्ती”चं नाटक! पूजेच्या साहित्यासाठी न्यायालयात धाव; पण पोलिसांनी अन् कोर्टाने दाखवला इंगा

Tuesday, 31 March 2026, 22:59

अहिल्यानगर हादरलं! पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ; साठवण तलावात तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, शोधकार्य सुरू

Tuesday, 31 March 2026, 22:14

शेताला पाणी देण्यावरून बाप-लेकात वाद! मुलाने शिव्या दिल्या म्हणून जन्मदात्याने पोटच्या लेकाला झोपेतच संपवलं…

Tuesday, 31 March 2026, 21:45
Next Post
Seized Two wheeler missing from yavat police station lik loni kalbhor police

जप्त मुद्देमाल वाहन विक्रीनंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील निलंबित चार पोलिसांचा आणखी एक काळा कारनामा समोर, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश असण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.