Mumbai Crime: मुंबई: पुण्यानंतर मुंबईत ही महिल्यांच्या अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेला मिटींगच्या बहाण्याने बोलावून तीच्यावर अत्याचार (Molest) करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक सदस्य जॉय जॉन पास्कल पोस्ट यांच्यासह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. Mumbai Crime

हेही वाचा- पुण्यात महिलांचं रस्त्यावर अजब कृत्य; असं काही केलं की पोलिसांनी…
मिळालेल्या माहितीनुसार,पीडितेला मिटींगसाठी एका मुंबईतील कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर तिला बंदूकीचा धाक दाखवत तिचे कपडे उतवण्यास भाग पाडले. आरोपीने महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली आणि त्यानंतर तिचे नग्न अवस्थेत फोटो व्हिडिओ काढले. त्यानंतर पीडितेला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली आणि आरोपींविरुध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार, ranco India Pharmaceutical कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि संस्थापक सदस्य जॉय जॉन पास्कल पोस्ट यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध कलम 354A (लैंगिक छळ), 354B (जबरदस्तीने कपडे उतरवणे), 509 (महिलेच्या प्रतिष्ठेचा भंग), 506 (धमकी) आणि आयटी अॅक्टचे कलम 66A यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.
महिलेने तक्रारीत सांगितले की, मिटींगसाठी ऑफिसमध्ये बोलावून घेतले आणि त्यानंतर बंदूीकीचा धाक दाखवत अश्लिल कृत्य केलं आणि फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुध्दा दिली. यानंतर मानसिक त्रास देखील दिला गेला.







