Tuesday, November 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! पश्चिम रेल्वेवर १०० नव्या गाड्यांचे नियोजन; पहिल्या टप्प्यात १७ गाड्या सुरू होणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 3 November 2026, 18:08

मुंबई : मेल-एक्स्प्रेस गाड्यांची प्रतीक्षा यादी आणि प्रवाशांची वाढती गर्दी यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढवण्याचे नियोजन करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात दादर आणि जोगेश्वरी येथून १७ अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पश्चिम रेल्वेवर १०० नव्या गाड्या चालवण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पश्चिम रेल्वेने दोन टप्प्यांत गाड्या सुरू करण्याची तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात दादर येथून पाच आणि जोगेश्वरी येथून १२ गाड्या सुरू करण्याचे नियोजन असून, या गाड्या नव्या वर्षात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

दादर स्थानकातून पाच अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यासाठी पूर्ण लांबीचा अतिरिक्त फलाट आणि रेल्वेमार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय दादर येथे प्रवास पूर्ण करणाऱ्या गाड्यांच्या देखभालीसाठी मध्य रेल्वेच्या जागेवर कोचिंग डेपो उभारण्यात येणार आहे. यासाठी करी रोड परिसरातील रेल्वेच्या जागेचा वापर केला जाणार आहे.

पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी रेल्वे टर्मिनस उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या नव्या टर्मिनसमधून पहिल्या टप्प्यात १२ लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे. डिसेंबर २०२६ अखेर हे काम पूर्ण होणार आहे.

टर्मिनसमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी स्वतंत्र सुविधा निर्माण करण्यात येत असून, लांब पल्ल्याच्या गाड्यांची प्राथमिक साफसफाईही येथे करता येणार आहे. या प्रकल्पासाठी ७६.४८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मुंबईबाहेर वसई येथे प्रस्तावित कोचिंग टर्मिनस उभारण्यात येत आहे. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील परस्परांचा अडथळा कमी करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

या टर्मिनसमधून पहिल्या टप्प्यात १२, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी तीन अशा एकूण १५ अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे उपनगरी लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील संघर्ष कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई सेंट्रल स्थानकातून नव्या गाड्या सुरू करण्याचे नियोजन नसले, तरी सध्या धावणाऱ्या गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे. सध्या पाच फलाटांवर १५ ते २१ डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात. आता सर्व फलाटांची लांबी २४ डब्यांच्या गाड्यांसाठी वाढवण्यात येणार आहे.

या कामासाठी ३४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, सप्टेंबर २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पश्चिम रेल्वेच्या या विस्तारामुळे मुंबईतून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक गाड्या उपलब्ध होणार असून, प्रतीक्षा यादी आणि गर्दीची समस्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे महापालिकेत गुप्तपणे शिरला ‘तो’ अज्ञात माणूस अन्… आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून दिवाळी गिफ्ट वाटण्याचा प्रयत्न!

Tuesday, 3 November 2026, 19:11

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! पश्चिम रेल्वेवर १०० नव्या गाड्यांचे नियोजन; पहिल्या टप्प्यात १७ गाड्या सुरू होणार

Tuesday, 3 November 2026, 18:08

पैशांचा वाद अन् क्रौर्याचा कळस! पत्नी आणि 5 वर्षांच्या चिमुकल्यावर पतीने फेकले उकळते मटण…

Tuesday, 3 November 2026, 18:04

पोलिसांची पाठ फिरताच कोरेगाव पार्कमधील ‘प्लंज’ पब पुन्हा सुरू! नियमांचे उल्लंघन, पुढील आदेशापर्यंत बंद

Tuesday, 3 November 2026, 17:39

पूर्णेकर हत्या प्रकरणावरून राजकारण तापले; मिनाक्षी शिंदेंची पूर्णेकर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवण्याची मागणी

Tuesday, 3 November 2026, 16:52

पुण्यात डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा गंडा; गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांचा मोठा डाव…

Tuesday, 3 November 2026, 16:40
Next Post

पुणे महापालिकेत गुप्तपणे शिरला 'तो' अज्ञात माणूस अन्... आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून दिवाळी गिफ्ट वाटण्याचा प्रयत्न!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp