Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ब्रीच कँडी रुग्णालयात एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट! मुख्यमंत्र्यांची फोनवरून विचारपूस तर अनेक दिग्गज नेते पवारांच्या भेटीला…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 6 November 2026, 16:25

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असताना त्यांना कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील नेते रुग्णालयात भेट देत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे नेते सचिन अहिर आणि मिलिंद देवरा हेही उपस्थित होते.

शरद पवार यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मी नुकतीच पवारसाहेबांची भेट घेतली. त्यांची प्रकृती उत्तम असून सुधारणा होत आहे. उद्या साहेबांना डिस्चार्ज मिळेल. पवारसाहेब मोठे नेते आहेत. भेटीदरम्यान राज्यातील दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा झाली. त्यांनी डिस्चार्जसाठी घाई न करता विश्रांती घ्यावी, असे मी त्यांना सांगितले. डॉक्टरांनीही त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले आहे.”

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील दौरा पूर्वनियोजित नव्हता, अशी माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही नियोजित कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती आहे.

शरद पवार यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शेकापचे जयंत पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली.

संजय राऊत यांनी भेटीदरम्यान शरद पवार यांना आपले ‘बोध कीर्तन’ हे पुस्तक भेट दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेही त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक नेत्यांनी फोनद्वारे संपर्क साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही शरद पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

याशिवाय आमदार राणा जगजितसिंह पाटील, उद्योगपती गौतम अदानी आणि इतर नेत्यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे मेट्रोला पहिल्याच दिवशी ५० हजार प्रवाशांचा प्रतिसाद! जिल्हा न्यायालय स्थानकावर सर्वाधिक गर्दी

Friday, 6 November 2026, 17:55

प्रेमप्रकरणातून रक्तरंजित थरार! नवी मुंबईत दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार; एकीच्या पाठीत, तर दुसरीही जखमी!

Friday, 6 November 2026, 17:42

पुण्यातील दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त; बिबवेवाडी पोलिसांची कारवाई

Friday, 6 November 2026, 17:17

भरतीवरील टांगती तलवार हटली! केंद्रप्रमुख पदाचा मार्ग मोकळा,2,410 उमेदवारांना दिलासा..

Friday, 6 November 2026, 16:36

ब्रीच कँडी रुग्णालयात एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट! मुख्यमंत्र्यांची फोनवरून विचारपूस तर अनेक दिग्गज नेते पवारांच्या भेटीला…

Friday, 6 November 2026, 16:25

अजित पवार गटातील मंत्र्याच्या अडचणी वाढणार? असीम सरोदे यांच्या एका ट्विटने राजकीय खळबळ; केला गंभीर दावा!

Friday, 6 November 2026, 16:01
Next Post

भरतीवरील टांगती तलवार हटली! केंद्रप्रमुख पदाचा मार्ग मोकळा,2,410 उमेदवारांना दिलासा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp