मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 66 उमेदवारांचा समावेश असून, अनेक नव्या चेहऱ्यांसह अनुभवी नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर, नवनाथ बन, गणेश खणकर, मनिषा यादव, आकाश पुरोहित, मिलिंद शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे.
भाजपाच्या या यादीत विविध समाजघटक, महिला आणि तरुण चेहऱ्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली असून, काही ठिकाणी नव्या उमेदवारांवर पक्षाने विश्वास टाकला आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. भाजपाने पहिली यादी जाहीर करत निवडणुकीची तयारी आक्रमकपणे सुरू केल्याचे दिसून येत आहे. उर्वरित उमेदवारांच्या नावाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
‘या’ उमेदवारांना संधी
1. वॉर्ड क्रमांक – 2 – तेजस्वी घोसाळकर
2. वॉर्ड क्रमांक 7 – गणेश खणकर
3. वॉर्ड क्रमांक 10 – जितेंद्र पटेल
4. वॉर्ड क्रमांक 13 – राणी त्रिवेदी
5. वॉर्ड क्रमांक 14 – सीमा शिंदे
6. वॉर्ड क्रमांक 15 – जिग्ना शाह
7. वॉर्ड क्रमांक 16 – श्वेता कोरगावकर
8. वॉर्ड क्रमांक 17 – शिल्पा सांगोरे
9. वॉर्ड क्रमांक 19 – दक्षता कवठणकर
10. वॉर्ड क्रमांक 20 – बाळा तावडे
11. वॉर्ड क्रमांक 23 – शिवकुमार झा
12. वॉर्ड क्रमांक 24 – स्वाती जैस्वाल
13. वॉर्ड क्रमांक 31 – मनिषा यादव
14. वॉर्ड क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा
15. वॉर्ड क्रमांक 37 – प्रतिभा शिंदे
16. वॉर्ड क्रमांक 43 – विनोद मिश्रा
17. वॉर्ड क्रमांक 46 – योगिता कोळी
18. वॉर्ड क्रमांक 47 – तेजिंदर सिंह तिवाना
19. वॉर्ड क्रमांक 52 – प्रीती साटम
20. वॉर्ड क्रमांक 57 – श्रीकला पिल्ले
21. वॉर्ड क्रमांक 58 – संदीप पटेल
22. वॉर्ड क्रमांक 59 – योगिता दाभाडकर
23. वॉर्ड क्रमांक 60 – सयाली कुलकर्णी
24. वॉर्ड क्रमांक 63 – रुपेश सावरकर
25. वॉर्ड क्रमांक 68 – रोहन राठोड
26. वॉर्ड क्रमांक 69 – सुधा सिंह
27. वॉर्ड क्रमांक 70 – अनिश मकवानी
28. वॉर्ड क्रमांक 72 – ममता यादव
29. वॉर्ड क्रमांक 74 – उज्ज्वला मोडक
30. वॉर्ड क्रमांक 76 – प्रकाश मुसळे
31. वॉर्ड क्रमांक 84 – अंजली सामंत
32. वॉर्ड क्रमांक 85 – मिलिंद शिंदे
33. वॉर्ड क्रमांक 87 – महेश पारकर
34. वॉर्ड क्रमांक 97 – हेतल गाला
35. वॉर्ड क्रमांक 99 – जितेंद्र राऊत
36. वॉर्ड क्रमांक 100 – स्वप्ना म्हात्रे
37. वॉर्ड क्रमांक 103 – हेतल गाला मार्वेकर
38. वॉर्ड क्रमांक 104 – प्रकाश गंगाधरे
39. वॉर्ड क्रमांक 105 – अनिता वैती
40. वॉर्ड क्रमांक 106 – प्रभाकर शिंदे
41. वॉर्ड क्रमांक 107 – नील सोमय्या
42. वॉर्ड क्रमांक 108 – दिपिका घाग
43. वॉर्ड क्रमांक 111 – सारिका पवार
44. वॉर्ड क्रमांक 116 – जागृती पाटील
45. वॉर्ड क्रमांक 122 – चंदन शर्मा
46. वॉर्ड क्रमांक 126 – अर्चना भालेराव
47. वॉर्ड क्रमांक 127 – अलका भगत
48. वॉर्ड क्रमांक 129 – अश्विनी मते
49. वॉर्ड क्रमांक 135 – नवनाथ बन
50. वॉर्ड क्रमांक 144 – बबलू पांचाळ
51. वॉर्ड क्रमांक 152 – आशा मराठे
52. वॉर्ड क्रमांक 154 – महादेव शिगवण
53. वॉर्ड क्रमांक – 172 – राजश्री शिरोडकर
54. वॉर्ड क्रमांक – 174 – साक्षी कनोजिया
55. वॉर्ड क्रमांक 185 – रवी राजा
56. वॉर्ड क्रमांक 190 – शितल गंभीर देसाई
57. वॉर्ड क्रमांक 195 – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
58. वॉर्ड क्रमांक 196 – सोनाली सावंत
59. वॉर्ड क्रमांक 207 – रोहिदास लोखंडे
60. वॉर्ड क्रमांक 214 – अजय पाटील
61. वॉर्ड क्रमांक 215 – संतोष ढोले
62. वॉर्ड क्रमांक 218 – स्नेहल तेंडुलकर
63. वॉर्ड क्रमांक 219 – सन्नी सानप
64. वॉर्ड क्रमांक 221 – आकाश पुरोहित
65. वॉर्ड क्रमांक 226 – मकरंद नार्वेकर
66. वॉर्ड क्रमांक 227 – हर्षिता नार्वेकर






