मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. संजय राऊत यांनी पत्रकार (Ajit Pawar Death) परिषदेत सरकारवर जोरदार टीका करत (Sanjay Raut) या प्रकरणाला “अपघात” नव्हे तर “सदोष मनुष्यवध” म्हटले. आमदार रोहित पवार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे अभ्यासपूर्ण आणि गंभीर असल्याचे सांगत त्यांनी डीजीसीएपासून ते VSR व्हेंचर्सपर्यंत अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Latest Marathi News)

राऊत म्हणाले की, रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन डीजीसीए आणि VSR कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते. मात्र ती मागणी फेटाळण्यात आली. “राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या जवळच्या नातेवाईकाची तक्रार नोंदवली जात नाही आणि वरून फोन येतात, हा काय प्रकार आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारचे दु:ख खरे आहे का, असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.
राऊत यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि VSR कंपनीच्या मालकांमध्ये आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप केला. कंपनीमध्ये काही राजकीय व्यक्तींची गुंतवणूक असल्याचा दावा करत तपासावर संशय व्यक्त केला. “बारामतीतील विमान दुर्घटनेत काहीतरी दडपले जात आहे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीतील एकत्रीकरणाबाबत बोलताना राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्याची प्रक्रिया संपल्याचे सांगितले. शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवतील आणि महाविकास आघाडी एकत्रित निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विमान दुर्घटनेच्या चौकशीवरून सुरू असलेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे तपासाच्या पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता अधिकृत अहवाल आणि पुढील कायदेशीर कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






