Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Urali Kanchan : उरुळी कांचनला सरपंच पदासाठी रंगणार घोडेबाजार? ग्रामपंचायतीचे राजकारण धक्कातंत्र व डावपेचावर अवलंबून; कोण बाजी मारणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 16 December 2025, 18:18
Urali Kanchan

photo- social media

Urali Kanchan : पुणे-सोलापूर महामार्गावरील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी (ता. 19) होणार आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून हि निवड होणार आहे. ग्रामपंचायतीसाठी या पंचवार्षिकमधील शेवटचे सरपंचपद असल्याने या निवडणुकीत सरपंच बिनविरोध होणार की घोडेबाजार होऊन निवडणूक होणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Urali Kanchan)

 

यापूर्वीच्या सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शुक्रवारी सरपंच पदाची निवडणूक होत आहे. गावातील प्रतिष्ठेचे हे पद असल्याने अनेक इच्छुकांनी कोणत्याही परिस्थितीत पद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू झाले असल्याची चर्चा आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पक्षनिहाय अथवा पॅनेलनिहाय लढली गेली नव्हती. त्यामुळे सरपंचपदासाठी ग्रामपंचायत स्तरावरील विविध गट एकत्र आले होते. यातूनच प्रथम सरपंचपदी संतोष हरिभाऊ कांचन व उपसरपंचपदी संचिता संतोष कांचन यांची निवड झाली होती.

शुक्रवारी होणाऱ्या सरपंचाची निवड ही सदस्यांमधून होणार असल्याने अनेक सदस्य हे सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. परिसरात औद्योगिकीकरण वाढले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सरपंचपद हे प्रतिष्ठा आणि पैसा मिळवून देणारे असते. त्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची संख्या अधिक आहे. गावाच्या सरपंच पदासाठीही रस्सीखेच आहे. त्यामुळे या पदाच्या निवडीच्या आधी घोडेबाजार सुरू झाला आहे. तसेच आगामी निवडणूकीत उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने प्रत्येकाचा कस या निवडणुकीत लागणार आहे.

दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सतराही जागा, विविध गटांनी आपापल्या पद्धतीने एकत्र येत सोयीनुसार आघाड्या करुन लढविल्या होत्या. हा प्रयोग उरुळी कांचनच्या राजकारणात रंगला होता. उरुळी कांचनचे यापूर्वीचे राजकारण लक्षात घेता, सरपंचपदासाठी घोडेबाजार रंगणार याबाबत उरुळी कांचन व परीसरात चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, नाव न छापण्याच्या अटीवर ज्येष्ठ राजकीय मातब्बर म्हणाले, “उरुळी कांचन येथील ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक ही होणारअसली तरी शेवटच्या 5 ते 10 मिनिटात कोण कोण अर्ज दाखल करतो यावर उरुळी कांचनचा सरपंच अवलंबून आहे. त्यामुळे दुसरा फॉर्म आला तर नक्कीच यावेळीही वेगळाच सरपंच दिसण्याची शक्यता आहे.”

शेवटच्या पाच मिनिटात धक्कातंत्र

मागील सरपंच पदाच्या निवडणुकीत मिलींद जगताप व अमित उर्फ बाबा भाऊसाहेब कांचन यांच्यात निवडणूक झाली होती. अमित कांचन यांनी शेवटच्या पाच मिनिटात अर्ज दाखल करून धक्कातंत्र अवलंबले होते. या डावपेचातून झालेल्या निवडणूकीत अमित कांचन यांनी 17 पैकी 9 मते मिळवून सरपंचपद खेचले होते. त्यामुळे उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे राजकारण अनेक धक्कातंत्र डावपेचावर अवलंबून असल्याने तालुक्यातील राजकीय मातबरांसह नागरिकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Andekar Gang News: Four arrested for collecting ransom of Rs 15,000 to Rs 20,000 per month for Andekar; Wife Sonali Andekar also a co-accused

‘धूम’ स्टाईल चोरी, 15 लाख चोरून चक्क ‘गटारात’ मुक्काम; पण पोलिसांच्या एका ‘आयडिया’ने खेळ खल्लास

Thursday, 2 April 2026, 15:25
Pune residents, beware! A gang of looters is active; they suddenly appear in front of a car and give the excuse of plotting to kill....

पुणेकरांनो सावधान! लूटमार करणारी टोळी सक्रिय; अचानक गाडीसमोर येतात अन् कट मारल्याचं कारण देत….

Thursday, 2 April 2026, 15:21
Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02
Next Post
Prithviraj Chauhan: "He provided girls to politicians, trapped them in a 'honey trap'" Prithviraj Chavan's 'that' statement created a stir in politics; What is the matter?

Prithviraj Chauhan: "त्याने राजकारण्यांना मुली पुरवल्या, त्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवलं" पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्याने राजकारणात गदारोळ; प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.