Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tilak Varma: भारताच्या ‘या’ धडाकेबाज फलंदाजाने विराट कोहलीचा विक्रम मोडला

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 15 December 2025, 11:34

Tilak Varma: धर्मशाळा येथे झालेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात युवा फलंदाज तिलक वर्माने एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिलक वर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक सरासरी असणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. या कामगिरीसह त्याने महान फलंदाज विराट कोहलीचा विक्रम मागे टाकला आहे.

 

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिलक वर्माने 35 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद  25 धावा केल्या. ही खेळी संयमी आणि परिस्थितीची गरज ओळखत केली. धावांचा पाठलाग करताना त्याने उपकर्णधार शुभमन गिलला भक्कम साथ दिली आणि संघाला विजयाच्या दिशेने नेण्यात मोलाची भूमिका बजावली.

विराट कोहलीचा विक्रम मोडीत

या नाबाद खेळीनंतर तिलक वर्माची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील सरासरी  70.50 इतकी झाली आहे. किमान 300 धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये ही सर्वोच्च सरासरी असून, याआधी हा विक्रम विराट कोहलीकडे होता. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध टी-20 फॉरमॅटमध्ये 70.28 ची सरासरी नोंदवली होती.

धावांचा पाठलाग करताना देखील तिलक वर्माची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना त्याची सरासरी  68  इतकी असून, या बाबतीतही त्याने विराट कोहली (67.1) याला मागे टाकले आहे.

आतापर्यंत तिलक वर्माने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना  16 टी-20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये  543 धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 72 असून सरासरी  68 इतकी आहे. दुसरीकडे, विराट कोहलीने आपल्या टी-20 कारकिर्दीत  48 सामन्यांत  2013 धावा केल्या असून त्याची सरासरी  67.10 आहे.

तिलक वर्माने तीन सामन्यांत 113 धावा केल्या

सध्याच्या भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेत तिलक वर्माने तीन सामन्यांत 113 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात 26, दुसऱ्या सामन्यात 62 आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद 25 धावांची खेळी त्याने केली.   अवघ्या  23 व्या वर्षी, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 14 डावांत 468 धावा केल्या असून त्याची सरासरी  58.5 इतकी आहे.

एकूणच, तिलक वर्माने  39 टी-20 सामन्यांत 1,110 धावा केल्या असून त्याची सरासरी  48.26 आहे. सातत्यपूर्ण कामगिरी, संयम आणि धावांचा पाठलाग करताना दाखवलेली परिपक्वता यामुळे तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा ‘चेस मास्टर’ म्हणून ओळख निर्माण करत आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील

Thursday, 2 April 2026, 14:54
Pawar family unites! Yugendra Pawar in the fray for "Wahini" in Baramati; A big hint that Sharad Pawar group will withdraw from the elections

पवार कुटुंब एकवटलं! बारामतीत “वहिनीं”साठी युगेंद्र पवार मैदानात; शरद पवार गटाचा निवडणुकीतून माघार घेण्याचा मोठा संकेत

Thursday, 2 April 2026, 14:45

विद्यापीठात विद्यार्थिनीच असुरक्षित? ABVP च्या आंदोलनाने वातावरण तापलं; सुरक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न!

Thursday, 2 April 2026, 14:15

‘काही बोलायचंय का?’, अशोक खरातने जोडले हात अन्…; कोर्टाच्या आवारात नक्की काय घडलं?

Thursday, 2 April 2026, 13:51

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09
Next Post
BREAKING NEWS: A boy who was seriously injured in a knife attack by a classmate at a private tuition class in Rajgurunagar has died during treatment.

BREAKING NEWS: राजगुरूनगर येथे खाजगी शिकवणी वर्गात वर्गमित्रावर चाकुहल्ला; गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.