Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 तासांत तिघांचा मृत्यू, दोन आकस्मिक मृत्यूची नोंद ; तर एकाची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 27 May 2025, 11:46

दौंड, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील चोवीस तासांत तिघांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून, यापैकी दोन मृत्यूंची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. तर एका तरुणाने रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

 

अभिषेक गोविंद पहाडे (वय 24, रा. निमगाव खेलू, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या तरुणाने पाटील हॉस्पिटल, दौंड येथील दुसऱ्या मजल्यावरील खासगी रूममध्ये बेडशिटच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना रात्री 10 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी भाऊ अभिषेक गोविंद पहाडे यांना डॉ. पाटील यांनी सदरची माहिती दिली. त्यानुसार सदर ठिकाणी पोहोचले असता पोलिसांच्या मदतीने भाऊ अभिषेक पहाडे यास खाली उतरून अबुलन्समधून उपजिल्हा रूग्णालय येथे घेवून गेले. यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याला औषधोपचारापूर्वी मयत झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू रजिस्टर नं. 70/2025 अन्वये नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत खोरवडी (ता. दौंड) येथील गट नं. 239 मधील एका शेताच्या विहिरीत अंदाजे 35-40 वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला. या इसमाने पांढऱ्या रंगाचा लाईनिंगचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स परिधान केली होती. व त्याचे केस लालसर रंगाचे होते. पोलीस पाटील भारत महादू जोरवर यांनी याबाबत दौंड पोलीस स्टेशनला माहिती दिली असून, आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तिसऱ्या घटनेत दौंड येथील आहीर गुरूजी भवन, शिवाजी चौक (दौंड) येथे ताराबाई विश्वचंद्र आहीर (वय 75) या महिला वैष्णवी फ्लॉवर मार्ट या दुकानात बसलेल्या असताना राहत्या घराची भिंत अचानक पत्र्याच्या शेडवर कोसळली. त्यांचा भाचा मंगलकुमार आहीर यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रिक्षाने आनंद हॉस्पिटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी आकस्मात मृत्यू क्रमांक 68/2025 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, तिन्ही घटनांमध्ये दौंड पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत. या मृत्यूंमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

पुण्यात ठाकरे गटाला खिंडार ; 'या' शिलेदाराचा शिंदे गटात प्रवेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.