Suraj Chavan New House : बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण सध्या लग्नाच्या चर्चेमुळे प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. अलीकडेच सूरजने आपल्या नवीन घराचा गृहप्रवेश केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ कमी वेळातच जोरदार व्हायरल झाला आहे. घराचा व्हिडिओ पाहून सर्वेच जण थक्क झाले आहे. (Suraj Chavan New House)

सूरजने आपल्या हक्काच घेतलं आहे. या घराचं नाव त्यानं बीग बॉस ठेवलं आहे. या घराच्या बांधकामात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केल्याचे सूरज यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेऊन स्वतः सांगितलं होतं. त्यानंतर अगदी कमी कालावधीत सूरजने आपल्या स्वप्नातील घरात प्रवेश केला आहे. लग्नाआधीच त्याने स्वत:च हक्काचं घर घेतल्याने अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुक केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत सूरज म्हणतो, आज केला माझ्या नवीन घराचा गृहप्रवेश, व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, घरात प्रवेश करताना मोठा हॉल आहे, ज्यात आकर्षित करणारे फ्लोरिंग, हायटेक किचन आणि वरच्या मजल्यावर जाण्यासाठी बांधलेले खास जिने—सगळीकडे आधुनिक डिझाइनचा प्रभाव स्पष्ट दिसतो. घरातील प्रत्येक भागात केलेली सजावट आणि रचना पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पहा व्हिडिओ
सूरजच्या या नव्या घराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून, चाहत्यांकडून त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हे घर पुण्यातील बारामती येथे बांधण्यात आले आहे.






