Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडूजमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 February 2023, 17:35

अजित जगताप

वडूज : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वडूज-पुसेगाव रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आज बारावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्रात गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नागरिकांनी आभार मानले.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीज तोडणी, ऊस तोडणी मुकादमकडून होणारी फसवणूक, एकरकमी एफ. आर. पी. देणे.  शेतक-यांना दिवसा किमान दहा दिवस वीज द्या, किमान हमीभावाचा कायदा लागू करा, शेतक-यांना दिवसा वीज द्या, पिकविमा तातडीने खात्यावर जमा करा, नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना पन्नास हजार रुपये दिले पाहिजे, अशा मागण्यांचे निवेदन खटावचे नायब तहसिलदार सचिन कर्णे यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 

सध्या विहिर व हातपंपमध्ये पाणी आहे मात्र, विज खंडित होत असल्याने पिके वाळली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सत्तेशिवाय कुणालाही काही देणेघेणे नाही, त्यामुळे खटाव तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. एफ. आर. पी.प्रमाणे कोणताच साखर कारखाने  शेतकऱ्यांच्या ऊसाला दर देत नाहीत. ऊसाची मोळी आल्यानंतर काही साखर कारखाने काटामारी करतात. त्या समस्या सोडवल्या जात नाहीत.

कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढ दि. ३१ मार्चपर्यंत देऊन फक्त पन्नास टक्के वीज बिलातून शेतकऱ्यांना  मुक्त करावे. काही ऊस तोडणी कामगार ऊसाची तोडणी वेळी लूट करत आहेत. ऊस गेल्यानंतर दोन दोन महिने शेतकऱ्यांना एफ आर पी नुसार उसाचे पेमेंट मिळत नाही. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला त्यांची खातेनीहाय चौकशी करावी. रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलं आणि न्याय पद्धतीनं मागण्या मांडणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर लाठी चार्ज केला.

शिंदे -फडणवीस युतीचे सरकार पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यावर ज्या पद्धतीने लाट्याला करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. या गोष्टीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. सोयाबीन, कपाशी, कांदा, द्राक्ष यासारख्या अनेक पिकांचे बाजारभाव पडले आहेत. सरकारने हस्तक्षेप करून हे बाजारभाव पूर्ववत करण्यासाठी हस्तक्षेप करून प्रयत्न करावे. असे ही शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खटाव तालुक्यातील पदाधिकारी-शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खटाव-माणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, स. पो. नि. दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर, दिपक देवकर, रमेश बर्गे, संदीप शेडगे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Solapur Crime : एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घुण हत्या प्रकरण..! चिमुरड्यानं दार लावल्याने अनर्थ टळला ; बाबा घरी पोहोचल्यानंतरच पडला घराबाहेर..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.