दीपक खिलारे
इंदापूर : “जिनके हौसले बुलंद होते है,उनकी जीत निश्चित होती है” याचा प्रत्यय शहरातील नागरिकांना नुकताच आला. शहरातील जेष्ठ नागरिकांनी योग साधनेच्या जोरावर आपली मानसिक, शारिरीक दुर्बलता दूर करुन चढाईसाठी अवघड असणारा वासोटा किल्ला सर करुन तरुणांमध्ये आदर्श निर्माण केला.
या वासोटा मोहिमेत राजेंद्र चव्हाण (वय ६७) सुनील देवळालीकर (वय ६५), चंद्रकांत देवकर( वय ६६), भिमराव वणवे ( वय ६५) मल्हारी घाडगे(वय ६४ ), काशिनाथ पारेकर (वय ५९ ) व देवराव मते (वय ५९) यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या समवेत युवा भारतचे कार्यकर्तेही सोबत होते.
जेष्ठ नागरिकांनी केलेल्या कामगिरीसाठी राधिका सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, स्वर्गीय मंगेश बाबा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक शेखर पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. व जेष्ठांच्या कार्याचे कौतुक केले.
जेष्ठ नागरिकांच्या सत्कारावेळी योग समितीचे रविंद्र परबत, शरद झोळ, बिभिषण खबाले, रामेश्वरजी साठे, सचिन पवार, प्रशांत गिड्डे, डॉ. दत्तात्रय कांबळे, ज्ञानदेव बोराटे, किसन पवार, आण्णासाहेब चोपडे, ज्ञानदेव डोंगरे, शंकर काशीद, विकास खिलारे, सुधीर दोंड व महिला योग समितीच्या मेघा भंडारी, रेखा भंडारी, सिंधू घाडगे, श्वेता कुलते या योगसाधकांसह, अॅड. विशाल चव्हाण, तहसील प्रभारी जयकुमार शिंदे उपस्थित होते.