Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बनावट एनए आदेशाने मावळात 9 .54 हेक्टर जमीन व्यवहाराचा घोटाळा; महसूल यंत्रणाही संशयाच्या भोवऱ्यात!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 22 September 2026, 12:31

संदीप बोडके

पुणे : मावळ तालुक्यातील मोरवे येथे कुळकायदा संवर्गातील भोगवटादार वर्ग- 2 ची तब्बल 9 हेक्टर 54 आर जमीन बनावट अकृषक (एनए) आदेशाच्या आधारे हस्तांतरित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट आदेशाचा वापर करून बंद असलेला सातबारा उघडण्यात आला. त्यानंतर जमिनीचे खरेदीखत करण्यात आले आणि संबंधित फेरफार नोंदीही मंजूर झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, काही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मौजे मोरवे येथील गट क्रमांक 361 मध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी मंडल अधिकारी सचिन कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनीष वसंत वाकडे (रा. वारजे, पुणे), विनोद भिमाजी डफळ (रा. वडगाव बुद्रुक, हवेली), समीर सदानंद काढगे (रा. आझादनगर, मुंबई), प्रियदर्शनी धोंडीराम शिंदे (रा. कोल्हापूर), समीर शिवशंकर लोहोकरे आणि स्मिता शिवशंकर लोहोकरे (रा. बोरिवली, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन बनावट आदेशांचा वापर

 

मावळ प्रांताधिकारी कार्यालयातील एनए/एसआर/256/2022, 8 सप्टेंबर 2022 आणि एनए/एसआर/45/2025, 17 ऑक्टोबर 2025 हे आदेश बनावट असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. या आदेशांचा आधार घेत मोरवे येथील गट क्रमांक 361 या भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया करण्यात आली. या जमिनीच्या एकूण 9 हेक्टर 54 आर क्षेत्राच्या अनुषंगाने 2023 मध्ये तब्बल चार खरेदीखत दस्त झाल्याचे उघड झाले आहे. बंद असलेला सातबारा बनावट एनए आदेशाच्या आधारे खुला करण्यात आल्यानंतर जमिनीच्या पुढील हस्तांतरणाचे व्यवहार झाल्याचेही तपासात पुढे आले आहे.

महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

या प्रकरणामुळे महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित जमीन भोगवटादार वर्ग-२ची असल्याने खरेदीखत करण्यासाठी बंद असलेला सातबारा उघडण्याचा आदेश अपर तहसीलदार अजित दिवटे यांनी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मोरवेच्या तलाठी मनीषा पाखरे यांनी खरेदीदस्ताच्या आधारे फेरफार नोंदी घेतल्या. मंडल अधिकारी सचिन कोकाटे यांनी फेरफार क्रमांक 1852, 1853, 1854 आणि 1855 मंजूर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बनावट आदेशाच्या आधारे जमीन व्यवहाराची प्रक्रिया नेमकी कशी पुढे गेली, सातबारा कोणत्या आधारावर खुला करण्यात आला आणि फेरफार नोंदी मंजूर करताना संबंधित कागदपत्रांची पडताळणी झाली होती का, याबाबत आता चौकशीची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया

“संबंधित महसूल यंत्रणेने बनावट आदेशानुसार कार्यतत्परता दाखवली आहे. या प्रकरणात महसूल यंत्रणेने तुकडेबंदी कायद्यातील नोंदी केल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संशय अधिक बळावला आहे. आरोपी आणि महसूल अधिकारी यांच्यात काही लागेबांधे आहेत का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबत महसूल अधिकाऱ्यांविरोधात आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.”
— सुनील गुजर, माहिती अधिकार कार्यकर्ते

“मौजे मोरवे येथील बनावट आदेश प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.”
— रविंद्र खामगळ, पोलिस उपनिरीक्षक

“वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन बोगस आदेश असल्याचे समोर आले असून, त्यापैकी एका आदेशाचा वापर करून हस्तांतरणाचे दस्त, फेरफार नोंदी आणि सातबारा करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.”

— सचिन कोकाटे, मंडल अधिकारी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे सामाजिक सलोख्याचे दर्शन ; गणेशोत्सवात मुस्लिम बांधवांकडून 30 गणेश मंडळांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट

Tuesday, 22 September 2026, 13:34

DJ नको, पारंपरिक वाद्ये वापरा म्हणणारे पोलीसच थिरकले DJ च्या तालावर! नऱ्हे पोलिसांच्या गणेश मिरवणुकीवरून आता सवाल

Tuesday, 22 September 2026, 13:32

भिगवणमधील वॉर्ड क्रमांक 1 ते 4 मधील काँक्रिटीकरणाच्या रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 22 September 2026, 13:17

नवजात अर्भकाचे शीर आणि हात धडापासून वेगळे; अर्भकाची अशी अवस्था कुणी केली? दौंडमध्ये खळबळ

Tuesday, 22 September 2026, 13:08

ऐन गणेशोत्सवात बापटांची कोर्टात धाव! लाऊडस्पीकरबाबत मुंबई हायकोर्ट काय सुनावणार?

Tuesday, 22 September 2026, 13:06

राज्यात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी! 5 शिक्षक-पदवीधर मतदारसंघांत मतदान कधी? मतमोजणीची तारीखही जाहीर!

Tuesday, 22 September 2026, 12:50
Next Post

राज्यात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी! 5 शिक्षक-पदवीधर मतदारसंघांत मतदान कधी? मतमोजणीची तारीखही जाहीर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp