Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rupali Thombre Patil: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे पूर्व विभागाची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर; रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडे मोठी जबाबदारी; कोणत्या पदावर नियुक्ती?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 December 2025, 19:51
Rupali Thombre Patil: NCP's Pune East division's 'jumbo' executive announced; Rupali Patil Thombre has a big responsibility; In which position will she be appointed?

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर (Rupali Thombre Patil) पूर्व विभागाची जम्बो कार्यकारिणी बुधवारी जाहीर झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पूर्व विभागाचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांनी ही यादी जाहीर केली. कार्यकारिणीत समन्वयक, निरीक्षक, शहर पदाधिकारी, विविध सेल प्रमुख अशा पदांवर मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. (Pune News)

 

या जाहीर केलेल्या कार्यकारिणीत ॲड. रूपाली पाटील ठोंबरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांच्या नाराजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. काही दिवसांपूर्वी प्रवक्तेपदाच्या फेरनिवडीत त्यांना वगळल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता त्यांना मिळालेली ही जबाबदारी पक्षातील अंतर्गत नाराजी निवळण्याचे पाऊल मानले जात आहे. पूर्व विभागात वडगाव शेरी, हडपसर, शिवाजीनगर आणि कसबा पेठ हे विधानसभा मतदारसंघ येतात. हाजी फिरोज शेख यांची कार्याध्यक्षपदी आधीच निवड झाली होती.

राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत तब्बल जवळपास 250 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 39 उपाध्यक्ष, 22 सरचिटणीस, 17 चिटणीस आणि 20 संघटक सचिवांचा समावेश आहे. चार विधानसभांतील विविध कार्यकर्त्यांना स्थान देत आगामी निवडणुकांसाठी पक्षाने संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, उर्वरित चार मतदारसंघांची कार्यकारिणी कधी जाहीर होणार, याबाबत अद्यापही उत्सुकता आहे.

दरम्यान, पक्षाकडून इतरही महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. माजी आमदार महादेव बाबर यांची प्रदेश प्रतिनिधीपदी, विकास पासलकर यांची प्रवक्तेपदी तसेच राकेश कामठे यांची शहर समन्वयकपदी नियुक्ती झाली आहे. तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, बाळासाहेब कोद्रे, नारायण लोणकर आणि विजय ढेरे यांची निरीक्षकपदी निवड झाली आहे. महिला विभागाच्या अध्यक्षपदी हसीना इनामदार, युवक विभागाच्या अध्यक्षपदी ईशान तुपे आणि युवती विभागाच्या अध्यक्षपदी लावण्या शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गरीबांची ‘जीवनदायिनी’ आता हायटेक! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता ‘फुल्ल डिजिटल’, 7 एप्रिलपासून जुनी पद्धत कायमची बंद

Friday, 10 April 2026, 7:54

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39

Daily Horoscope: करिअरमध्ये प्रगती आणि हातात पैसा; माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज ‘या’ राशींची चांदी होणार!

Friday, 10 April 2026, 7:31

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
Next Post
Pune Crime

Pune Crime : पुण्यात 'चण्या'चा मर्डर करीन...! ''तुझे तुकडे-तुकडे करीन,मला शिव्या देऊ नकोस'' सिंहगड रोडवर थरार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.