प्रतिनिधी,अमित मुंडीक
Pune News : मध्य रेल्वे पुणे विभागात 1 ते 6 डिसेंबरदरम्यान रेल्वे इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रीय सिव्हिल डिफेन्स विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात आला. डीआरएम राजेश कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण आणि सलामी स्विकारून झाली.

आपत्ती व्यवस्थापन, बचाव तंत्रे, गर्दी नियंत्रण, मल्टी-स्टोरी इमारतीतील बचाव, भूकंपातील तात्काळ मदत, CPR व फर्स्ट-एड अशा विविध थेट प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाल आहे. प्रात्यक्षिकांचे निरीक्षण अपर विभागीय रेल्वे अधिकारी व विविध शाखांतील अधिकाऱ्यांनी केले.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल डीआरएम वर्मा यांनी सिव्हिल डिफेन्स पथकाला गौरव पुरस्कार जाहीर केला आणि सर्व कर्मचाऱ्यांनी असे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.







