पुणे: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील (Pune Land Scam) आरोपी शितल तेजवानी (Sheetal Tejwani) यांना न्यायालयाने आणखी चार (Parth Pawar) दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या (Ahit Pawar) प्रकरणात वतनदारांच्या बाजूने करण्यात आलेल्या सबमिशनदरम्यान न्यायालयात महत्त्वाचे (Pune News) मुद्दे मांडण्यात आले. वतनदारांच्या (Pune Crime) वकिलांनी सांगितले की 2006, 2007 आणि 2008 या कालावधीत ज्यांच्य नावावर पावर ऑफ अटर्नी तयार करण्यात आली होती, त्या पैकी 28 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत व्यक्तींच्या नावाने तयार केलेल्या पावर ऑफ अटर्नीचा वापर कायदेशीरदृष्ट्या अमान्य ठरतो, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

तथापि, या मृत व्यक्तींच्या पावर ऑफ अटर्नीचा आधार घेत शितल तेजवानी यांनी 2025 मध्ये खरेदीखत तयार केले आणि ती जमीन एका मीडिया कंपनीच्या नावावर करून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहाराची वैधता आणि प्रक्रिया याबाबत संशय व्यक्त करण्यात आला असून, संबंधित कागदपत्रे कशी तयार झाली आणि त्यांचा वापर कसा करण्यात आला, याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले.
याचबरोबर या जमिनीच्या व्यवहारात जवळपास 300 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशयही वकिलांनी न्यायालयात व्यक्त केला. एवढ्या मोठ्या रकमेचा स्रोत काय, पैसे कुठून आले, कोणाकडून मिळाले आणि त्यांचा पुढील वापर कसा झाला, याबाबत तपासाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आणखी तपासाची मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत शितल तेजवानी यांना पुढील चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.







