पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी (Pune Crime) परिसरात अल्पवयीन (Pune News) मुलीवर अत्याचार झाल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुनाकिब नासिर अन्सारी नामक आरोपीला ताब्यात घेतले आहे. 4 डिसेंबर रोजी ही घटना घडली असून, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरीत कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

बसस्टँडवर ओळख, शाळेत सोडतो म्हणाला अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुनाकिब अन्सारी हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याची आणि पीडित मुलीची ओळख काही दिवसांपूर्वी एका बसस्टॉपवर झाली होती. ओळख वाढल्यानंतर 4 डिसेंबर रोजी आरोपीने मुलीला “शाळेत सोडतो” असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला आपल्या दुचाकीवर बसवले. मात्र, शाळेत न नेता आरोपी तिला थेट एका खोलीत घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. (Marathi News)
हेही वाचा: भष्ट्राचाराचा खेळ संपेना! एकाच दिवशी दोन कॅश बॉम्ब फुटले, आमदारानंतर अधिकारीही…
आरोपीला तात्काळ अटक
अत्याचारानंतर पीडित तरुणीने घरी जाऊन कुटुंबीयांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कुटुंबीयांनी तात्काळ विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी अल्पावधीतच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. (Breaking News)
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी मुनाकिब नासिर अन्सारी याच्याविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यानेच असा गुन्हा केल्यामुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून, महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Pune Crime News)






