Corruption Video: महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ राजकारण तापले आहे. राज्यात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दोन मोठे व्हिडिओ समोर आल्याने मोठा धक्का लागला आहे. या व्हिडिओ सोबत अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला आहे. व्हिडिओत त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या गड्ड्यांसह गंभीर आरोप केला आहे. Cash Bomb Video

हेही वाचा- लाखोंचे बंडल हातात… ‘त्या’ आमदाराचा Video व्हायरल, दानवेंचा थेट राज्य सरकारला सवाल
अशातच मनसे गटाचे नेते संदीप देशपांडे सज्ज झाले आहे त्यांनी देखील भष्ट्राचाराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी लाच घेतली आहे. हा व्हिडिओ थेट पत्रकार परिषदेत दाखवला गेला. देशपांडे म्हणाले की, पीडब्ल्यूडीच्या हाफकीन शाखेत शासनाकडून मिळणाऱ्या निधीवर टक्केवारी आकारली जाते. त्यांनी आरोप केला की 2,80,000 रुपये एवढी रक्कम केवळ निधी मिळवून देण्यासाठी घेतली जात असल्याचे पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत.
त्यांच्या मते, कंत्राटदारांकडून पूर्वी एकच ठराविक टक्केवारी घेतली जात होती. परंतु आता निधी मंजुरी, वर्क ऑर्डर प्रक्रिया आणि अंतिम बिल तयार करण्यासाठी स्वतंत्र टक्केवारी आकारली जाते. व्हिडिओत त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहे.
हिवाळी अधिेवशेन सुरु असताना दरम्यान राजकारणातील व्यक्तींनी भष्ट्राचार केलाच्या गंभीर आरोप केला जात आहे. अधिवेशनाच्या काळात ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचे नेते सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरण्याच्या तयारीत असून, या दोन्ही कॅश बॉम्ब प्रकरणांवर विधानसभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






