Pune Crime: हडपसर, ता. 09 : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहनचोरी (Bike thief) करणाऱ्या आरोपीला तुळजापूर–लातूर परिसरात शोध घेऊन हडपसर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चार चोरीच्या दुचाकींचा गुन्हा उघडकीस आला आहे. रवींद्र शिवाजी घाटे (वय 40, रा. दहीवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. यामध्ये पोलिसांनी बुलेट, होंडा शाईन व टिव्हीएस रायडर अशा पाच गाड्यांचा समावेश आहे. Pune Crime

हेही वाचा- दुचाकी चोरटा जेरबंद ; 4 दुचाकी जप्त, हडपसर पोलिसांची कामगिरी
हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि सत्यवान गेंड यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बार्शी, तुळजापूर व लातूर भागात विशेष तपास मोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दुसऱ्या एका कारवाईत एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेऊन एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. एकूण जप्त वाहनांची किंमत अंदाजे 3 लाख 30 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार यांनी केली आहे






