Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Prithviraj Chavhan : एपस्टीन फाईल्स : १९ डिसेंबरला भारताच्या राजकारणात ‘भूकंप’? पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘मराठी PM’ दाव्याने खळबळ; पडद्याआड नेमकं काय आहे?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 14 December 2025, 11:53
Prithviraj Chavhan

photo- ppn

Prithviraj Chavhan : अमेरिकेतील कुख्यात उद्योगपती जेफ्री एपस्टीन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे जाहीर करण्यासाठी अमेरिकेच्या न्याय विभागाला 19 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कागदपत्रांचा खुलासा ‘एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’ अंतर्गत होणार आहे. त्यामुळे जगभरात उत्सुकता वाढली आहे.

 

या पार्श्वभूमीवर भारतातही चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सांगत आहेत की या एपस्टीन फाईल्समुळे भारतात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. इतकंच नाही, तर मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, असाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या फाईल्सकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे दावे फेटाळून लावले असले, तरी पृथ्वीराज चव्हाण आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. (Prithviraj Chavhan)

भारताविरोधात काही ठोस माहिती आहे का?

एपस्टीन प्रकरणात सध्या काही नवे फोटो समोर आले आहेत. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, उद्योगपती बिल गेट्स हे काही महिलांसोबत दिसत आहेत. मात्र या फोटोंमध्ये एकही अल्पवयीन मुलगी दिसत नाही. त्यामुळे फक्त फोटो समोर आले म्हणून गुन्हा सिद्ध होतो, असं म्हणता येत नाही.

महत्त्वाचं म्हणजे, आतापर्यंत समोर आलेल्या कोणत्याही माहितीतून भारत सरकार किंवा कोणत्याही भारतीय अधिकाऱ्यावर गुन्हेगारी आरोप सिद्ध होतील, असे ठोस पुरावे नाहीत.

भारतातून कोणती नावे चर्चेत?

नवीन ई मेल्समध्ये 2019 साली जेफ्री एपस्टीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकन रणनीतीकार स्टीव्ह बॅनन यांच्याशी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख आहे. याशिवाय उद्योगपती अनिल अंबानी, भाजप नेते हरदीपसिंग पुरी आणि लेखक दीपक चोप्रा यांची नावेही संदर्भासाठी आढळतात. मात्र हे सर्व उल्लेख सामाजिक किंवा आंतरराष्ट्रीय संपर्कांपुरते मर्यादित आहेत. लैंगिक शोषण किंवा तस्करीशी त्यांचा थेट संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.

भारतात खरंच राजकीय भूकंप होणार?

तज्ज्ञांच्या मते, या फाईल्समुळे भारतात चर्चा, अफवा आणि तर्क-वितर्क वाढू शकतात. पण मोदी सरकार किंवा भारतीय राजकारणाला मोठा धक्का बसेल, अशी शक्यता सध्या तरी कमीच आहे. कारण आतापर्यंत समोर आलेली माहिती फारशी गंभीर नाही.

पुढे काय उघड होऊ शकतं?

19 डिसेंबरपर्यंत किंवा त्यानंतर ग्रँड ज्यूरीचे अहवाल, तपास यंत्रणांचे निष्कर्ष आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे समोर येऊ शकतात. मात्र पीडितांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी आणि सुरू असलेल्या तपासामुळे अनेक गोष्टी अजूनही लपवून ठेवल्या जातील. त्यामुळे भारतासंदर्भात काही नवे मुद्दे आले, तरी ते मर्यादित स्वरूपाचेच असण्याची शक्यता आहे. (Prithviraj Chavhan)

जेफ्री एपस्टीन नेमका कोण होता?

जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील श्रीमंत फायनान्सर होता. मोठमोठ्या आणि प्रभावशाली लोकांचे पैसे गुंतवण्याचं काम तो करत होता. न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि स्वतःच्या खासगी बेटावर तो अनेक बड्या लोकांच्या संपर्कात होता. मात्र याच काळात त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप झाले.

गंभीर आरोप आणि संशयास्पद मृत्यू

एपस्टीनवर अनेक मुलींना पैसे देऊन फूस लावल्याचे आरोप होते. त्याची सहकारी घिस्लेन मॅक्सवेल मुली शोधून आणायची, असं तपासात समोर आलं. 2019 मध्ये न्यूयॉर्कमध्ये अटक झाल्यानंतर खटला सुरू होण्याआधीच 10 ऑगस्ट 2019 रोजी तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. अधिकृतरित्या आत्महत्या सांगण्यात आली, पण सीसीटीव्ही फुटेज गायब, सुरक्षेतील त्रुटी आणि शवविच्छेदन अहवालांमुळे आजही अनेकांना संशय आहे.

अमेरिकेत काय परिणाम होणार?

या प्रकरणामुळे अमेरिकेत मोठा राजकीय वाद सुरू आहे. डेमोक्रॅट पक्ष सर्व कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी करत आहे. तरीही आजपर्यंत कोणतीही अधिकृत “क्लायंट लिस्ट” समोर आलेली नाही. एपस्टीनची सहकारी घिस्लेन मॅक्सवेल हिला दोषी ठरवून 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

एकंदरीत, 19 डिसेंबरला नेमकं काय समोर येतं, याकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

Pune Crime: ससून रुग्णालयात रक्तरंजित खेळ, रुग्णावर जीवघेणा हल्ला; 3 वर्षापासून फरार आरोपीला अखेर अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.