पिंपरी-चिंचवड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Pimpri-Chinchwad Crime) निवडणुका जवळ येत असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हेगारी (Pimpri-Chinchwad News) टोळ्यांचा डाव (PCMC News) उधळून लावला आहे. गुंडा विरोधी पथकाने केलेल्या तीन (Pune Crime) स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल 7 पिस्तुलं आणि 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही शस्त्रं धुळे जिल्ह्यातून पिंपरी-चिंचवडकडे आणली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी 5 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा अनर्थ टळल्याची चर्चा सुरू आहे. (Breaking News)

आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुहास उर्फ पिल्या बालाजी गायकवाड, अभय विकास सुरवसे, ओमकार सिद्धेश्वर बंडगर, समीर लक्ष्मण इजगज आणि धर्मेंद्र हरिप्रसाद सेन अशी आहेत. यापैकी सुहास गायकवाड, अभय सुरवसे, ओमकार बंडगर आणि समीर इजगज हे एकाच टोळीचे सदस्य असून त्यांच्यावर हत्या, मारामारी आणि हत्येचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
घटनेचा तपास सुरु…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासादरम्यान आरोपींनी पिस्तुलं धुळे जिल्ह्यातून आणल्याची कबुली दिली आहे. मात्र ही शस्त्रं नेमकी कोणासाठी आणि कशासाठी आणली जात होती, तसेच त्यामागे कोणताही घातपाती कट होता का, याचा सखोल तपास सुरू आहे.
आरोपींना अटक
पहिल्या कारवाईत तिघा आरोपींकडून 4 पिस्तुलं आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत समीर इजगजकडून 2 पिस्तुलं आणि 2 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. तिसऱ्या कारवाईत धर्मेंद्र सेन याच्याकडून 1 पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आळंदी, वाकड आणि सांगवी पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.







