लोणी काळभोर : लोणी काळभोर येथील सेंट तेरेसा हायस्कूलची विद्यार्थिनी नेत्रा भागवत थोरात हिने सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय शालेय वेट लिफ्टिंग क्रीडा स्पर्धा मणिपूर मधील इंफाळ येथे पार पडल्या.
या स्पर्धेत नेत्राने ४० किलो वजन गटात स्नॅच या प्रकारात ५० किलो व क्लिन अँड जर्क या प्रकारात ६२ किलो उचलले. नेत्राने एकूण ११२ किलो वजन उचलून चौथा क्रमांक मिळवला आहे. मागील वर्षी, बिहार येथे झालेल्या राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत नेत्राने १०२ किलो उचलले होते. ७ व्या खेलो इंडीया युथ गेम्स-२०२५ साठी नेत्राची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजन बिहार मध्ये होणार आहे.