Monday, July 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला मोठा धक्का ; सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विलोकन याचिका फेटाळली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 July 2026, 16:44

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. कराड याने जामिनासाठी दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावली आहे.

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने 14 जुलै 2026 रोजी या प्रकरणावर सुनावणी घेतली. ‘मागील आदेशात अशी कोणतीही चूक किंवा त्रुटी नाही, ज्यावर पुन्हा विचार करण्याची गरज भासेल,’ असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा निर्णय दिला. यापूर्वी सत्र आणि उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन नाकारला होता, तर सर्वोच्च न्यायालयाने 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्याला दिलासा देण्यास नकार दिला होता.

हे अत्यंत थरारक आणि अमानुष हत्याकांड 9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या केज तालुक्यातील टाकळी शिवार भागात घडले होते. आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार आणि प्रतीक घुले यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना सुदर्शन घुले याच्या शेतात नेऊन विवस्त्र केले आणि लोखंडी रॉड तसेच गॅस पाईपने बेदम मारहाण करून त्यांचे हात-पाय तोडले. या अंगावर काटा आणणाऱ्या कृत्यादरम्यान, परळीतील गुंड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मीक कराड याला आरोपींनी थेट ‘व्हिडिओ कॉल’ करून हा सर्व प्रकार लाईव्ह दाखवला होता.

 

या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सर्व आरोपींवर तातडीने ‘मकोका’ अंतर्गत कडक कारवाई केली. तपासादरम्यान पोलिसांनी न्यायालयात तब्बल 1800 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमधून हत्येचे थेट 15 व्हिडिओ आणि 8 फोटो मिळाले आहेत, ज्यामध्ये आरोपी मारहाण करताना आनंद साजरा करताना दिसत आहेत.

दरम्यान या भक्कम पुराव्यांमुळे न्यायालयाने 12 मार्च 2025 रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीतच आरोपी जयराम चाटेला तुरुंगातच ठेवण्याचे आदेश दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या या निर्णयामुळे आरोपींच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी गुड न्यूज! आता तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकण्याची गरज नाही; महापालिकेचे ‘हे’ दोन प्रकल्प काय आहेत?

Sunday, 19 July 2026, 22:55

वर्ल्ड कप फायनलच्या रात्री काय होणार? सरकारने दिला ‘हा’ मोठा आदेश; नक्की काय आहे प्लॅन?

Sunday, 19 July 2026, 22:19

पोलीसच निघाले भामटे! फिल्मी स्टाईलने एंट्री मारली; कमी दरात सोनं मिळवून द्यायचं नाटक केलं अन्…

Sunday, 19 July 2026, 21:33

पुणेकरांनो सावधान! २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून पुण्यात लागू होणार ‘हे’ कडक नियम; शहरात १४ दिवस राहणार विशेष निर्बंध

Sunday, 19 July 2026, 20:49

विठुरायाच्या भेटीसाठी पालख्या दिंड्या पंढरीकडे मार्गस्थ ..

Sunday, 19 July 2026, 20:41

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न! पुण्यात ८०० वाहनांचे ‘फिटनेस’ प्रमाणपत्र गायब; आरटीओचा कारवाईचा इशारा

Sunday, 19 July 2026, 19:45
Next Post

'लाडकी बहीण' योजनेवर आरोपांची सरबत्ती, अदिती तटकरेंनी विरोधकांना दिलं ठणकावून उत्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.