Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘वाल्मीक अण्णाला भेटलीस तर याद राख!’ म्हणत महिलेचा छळ? मुलीला बेडवर फेकलं, पतीलाही मारहाण; सुशील कराडविरोधात FIRमध्ये गंभीर आरोप!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 31 October 2026, 14:01

बीड : सोलापूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांवर (अनिल मुंडे व गोपी गंजेवार) अत्यंत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मध्यस्थी आणि आदेशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार महिला सोलापूरची रहिवासी असून तिचे पती सुशील कराडकडे काम करत होते. दरम्यान, या महिलेने स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू करून बँकेच्या कर्जावर दोन बलकर ट्रक, दोन कार आणि दोन दुचाकी खरेदी केल्या होत्या. याशिवाय परळी वैजनाथ येथील जलालपूर परिसरात 30 लाख रुपयांचा एक प्लॉटही घेतला होता. कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची झालेली ही आर्थिक प्रगती आरोपींना सहन झाली नाही. व्यवसाय बंद करून सर्व मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी आरोपींनी पीडित कुटुंबाला धमकावण्यास व त्रास देण्यास सुरुवात केली.

मे 2024 मध्ये आरोपींनी पीडितेच्या पतीला डांबून ठेवत बेदम मारहाण केली आणि बंदुकीचा धाक दाखवून सर्व वाहनांच्या चाव्या व कागदपत्रे हिसकावून घेतली. त्यानंतर 7 मे 2024 रोजी तिन्ही आरोपींनी पीडितेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. पतीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून तिला ढकलून दिले आणि तिचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला.

आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवून परळी येथील रजिस्ट्रार कार्यालयात पीडित कुटुंबाकडून 30 लाख रुपयांचा प्लॉट अनिल मुंडेच्या नावावर हस्तांतरित करून घेतला. इतकेच नाही तर 17 मे रोजी घरातील सोन्याची अंगठी विकायला लावून 1 लाख 33 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने लाटली.

या त्रासाला कंटाळून पीडित कुटुंबाने बीडला जाऊन वाल्मिक कराडची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी गोपी गंजेवार याने पुन्हा घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली. स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला तक्रार न घेतल्याने पीडितेने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळांचा इशारा? एल निनोनंतर आता ला निनाचे संकट

Saturday, 31 October 2026, 14:53

युती सत्तेची, कुस्ती शिव्यांची; महायुतीत नेत्यांचा ‘तमाशा’! धंगेकरांचा बन यांना ‘नसबंदी’चा इशारा; वाद मिटविणार कोण?

Saturday, 31 October 2026, 14:43

थेऊरमध्ये हृदयद्रावक घटना! कपडे वाळत घालताना विजेचा धक्का लागून विवाहितेचा जागीच मृत्यू

Saturday, 31 October 2026, 14:09

‘वाल्मीक अण्णाला भेटलीस तर याद राख!’ म्हणत महिलेचा छळ? मुलीला बेडवर फेकलं, पतीलाही मारहाण; सुशील कराडविरोधात FIRमध्ये गंभीर आरोप!

Saturday, 31 October 2026, 14:01

लोणी काळभोर येथील बाळासाहेब सायकर यांची वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय संयुक्त सचिवपदी निवड!

Saturday, 31 October 2026, 13:49

12 किलो गांजासह अटक झालेला पोलिस अंमलदार शासकीय सेवेतून बडतर्फ; तेलंगणातील वारंगलमध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी कारवाई

Saturday, 31 October 2026, 13:32
Next Post

थेऊरमध्ये हृदयद्रावक घटना! कपडे वाळत घालताना विजेचा धक्का लागून विवाहितेचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp