Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jejuri News: जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारासह खाजगी इसमावर 2 हजार रुपयांच्या लाचेचा गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 17 December 2025, 18:55
Jejuri News: A case of bribe of Rs 2,000 has been registered against a police constable and a private individual from Jejuri police station.

जेजुरी: जामीनपात्र वॉरंट करून देण्यासाठी 2 हजार (Jejuri News) रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारासह खाजगी इसमावर लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेजुरी (ता. पुरंदर) पोलीस ठाण्यात आज बुधवारी (ता.17) गुन्हा दाखल केला आहे.

 

दशरथ शिवाजी बनसोडे (वय 57, पोलीस हवालदार, साळुंखे बिल्डिंग, बडोदा बैंकेच्या शेजारी, मोरगाव रोड, जेजुरी ता. पुरंदर जि. पुणे (वर्ग 3) व खाजगी इसम सचिन अरविंद चव्हाण (रा. चव्हाण वस्ती, वाल्हा, ता. पुरंदर जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका 59 वर्षीय व्यावसायिकाने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक कापड व्यावसायिक आहेत. तक्रारदार यांच्या मुलाने सन 2019 मध्ये एका इसमाविरोधात जेजुरी पोलीस ठाणे येथे सावकारकीच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व तक्रादाराची पत्नी असे दोन साक्षीदार होते.

दरम्यान, पोलीस हवालदार दशरथ बनसोडे व खाजगी इसम सचिन चव्हाण हे तक्रारदाराच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी तक्रारदार व तक्रारदाराची पत्नी विरुद्ध सन 2019 मध्ये तक्रारदाराच्या मुलाने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये गेट वॉरंट निघाले असून ते रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक पोलीस हवालदार बनसोडे यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या व त्यांची पत्नी विरुद्ध निघालेले जामीनपात्र वॉरंट रद्द करून देण्यासाठी 2 हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच खाजगी इसम सचिन चव्हाण याने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7,71, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
PunePune News: Two-wheelers skidded due to tractor oil spill on Pune-Solapur highway; Traffic Branch Constable Anil Gaikwad averted a major accident

Pune News: पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅक्टरच्या ऑइल गळतीमुळे दुचाकी घसरल्या; वाहतूक शाखेचे हवालदार अनिल गायकवाड यांच्यामुळे मोठी दुर्घटना टळली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.