Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगाव गणपती येथील भूखंड लाटल्याप्रकरणी पाचुंदकरांना हायकोर्टाचा दणका : तत्कालीन महसूल मंत्र्यांचा आदेश कायम

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 23 March 2025, 11:33

शिरूर : रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील गावठाणातील ७२ गुंठ्यांच्या भूखंडाचे श्रीखंड लाटल्याप्रकरणी तत्कालीन महसूल मंत्र्यांनी दिलेला आदेश कायम ठेवत मुंबई हायकोर्टाने आनंदराव दिनकर पाचुंदकर यांचे अपील फेटाळले असून,रांजणगाव गणपती देवस्थानच्या अध्यक्षा व माजी जि.प.सदस्या स्वाती दत्तात्रय पाचुंदकर यांचे सासरे आनंदराव दिनकर पाचुंदकर यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे.

सध्याच्या बाजारभावाप्रमाणे रांजणगाव गणपती येथील ७२ गुंठे जमीन हडपल्याचे प्रकरण हे सुमारे कोट्यावधी रुपयांचे आहे.असा दावाही विद्यमान सरपंच व उपसरपंच यांनी केला आहे.ग्रामपंचायतीचे सन १९६०-६१ चे रेकॉर्ड भिजल्याचा गैरफायदा घेऊन, संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांना हाताशी धरून राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांनी बनावट रेकॉर्ड बनवले आणि ८अ मध्ये खाडाखोड करून व पाने चिकटून आनंदराव पाचुंदकर यांचे सन १९६०-६१ मध्ये वय-१२ वर्ष असताना गावठाणातील सुमारे ७२ गुंठे मिळकतीवर सिटी सर्वे मार्फत आनंदराव पाचुंदकर यांचे नाव २००८- २००९ मध्ये नोंदवले.

दरम्यान सन-२०१९ ला ग्रामपंचायतीची सत्ता पाचुंदकर विरोधी गटाच्या ताब्यात आली त्यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सर्जेराव खेडकर होते.पाचुंदकर विरोधी गटाकडे ग्रामपंचायतीची सत्ता आल्यानंतर गाव नमुना आठमध्ये खाडाखोड करून जमीन बळकविण्याचा केलेला प्रकार सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आला.त्यानंतर महाराष्ट्र शासनाची हडपलेली जमीन वाचविण्यासाठी पाचुंदकर विरोधी गटाने तत्कालीन महसूलमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.त्यावेळी महसूलमंत्र्यांसमोर झालेल्या सुनावणीनंतर त्यांनी संबंधित मिळकतीतून आनंदराव पाचुंदकर यांचे नाव वगळून शासनाचे नाव दाखल करण्याचा आदेश दिला होता.त्यामुळे संबंधित आदेशाच्या विरोधात आनंदराव दिनकर पाचुंदकर यांनी दाद मागण्यासाठी हायकोर्टात अपील केले होते.ते अपील हायकोर्टाने बुधवारी १९ मार्च रोजी फेटाळले आहे अशी माहितीसरपंच सुवर्णा वायदंडे व उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर यांनी दिली.

मात्र,सन २०१४ ते २०१७ दरम्यान आनंदराव पाचुंदकर यांच्या स्नूषा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर ह्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या सरपंच व नंतर जि. प.सदस्या झाल्या. त्यांच्याकडून आणि सन २००८ ते २००९ पासून संबंधित प्रकरणाशी संबंधित सर्वच पदाधिकारी व अधिकारी हे कायदेशीर रित्या दोषी आढळले आहेत.त्यामुळे तत्कालीन सर्वांकडूनच पदाचा गैरवापर करण्यात आला असा आरोपही पाचुंदकर विरोधी गटाकडून करण्यात आला आहे.तत्कालीन संबंधित सर्वच पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी पाचुंदकर विरोधी गटाने केली आहे.

 
योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जरांगे यांच्या उपोषणादरम्यान सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी थेट ४ GR जारी; वाचा सविस्तर

Monday, 7 September 2026, 14:07

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात 24 घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद; 16 तोळे सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

Monday, 7 September 2026, 13:16

चर्चगेटला अहिल्यादेवींचे नाव अन् शिंग्रोबांच्या नावाने महामार्ग! बाळूमामा देवस्थानासाठीही स्वतंत्र कायद्याची धनगर समाजाची मागणी

Monday, 7 September 2026, 12:54

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग की फेरीवाल्यांचा बाजार? व्हीआयपींसाठी यंत्रणा तत्पर, सामान्यांसाठी मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी

Monday, 7 September 2026, 12:47

‘गॅस कनेक्शन अपडेट’चा एक मेसेज अन् खातं साफ! बिबवेवाडीतील महिलेची 9.66 लाखांची फसवणूक

Monday, 7 September 2026, 12:26

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू; भाव आणखी कमी होण्याची शक्यता

Monday, 7 September 2026, 12:14
Next Post

पुण्यातील' त्या 'नराधम पित्यास 28 मार्चपर्यंत अखेर पोलीस कोठडी : स्वतःच्या मुलाच्या खुनासाठी चाकूसह ब्लेडचा वापर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp