Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 राज्यात मुसळधार पावसाची स्थिती गंभीर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा 

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 19 August 2025, 15:57

मुंबई: राज्यभरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथे परिस्थितीचा आढावा घेतला.

 

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. “राज्य सरकार आणि यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

 मुंबईसह पाच जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दर तीन तासांनी अहवाल सादर  केला जात आहे.

 शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

राज्यातील 10 लाख एकर शेती पूराच्या पाण्याखाली गेली असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  धरणांवरील जलसाठ्यावर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, धोका असलेल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे संदेश पाठवले जात आहेत. नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू आहे.

 नांदेडसह पूरग्रस्त भागांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तैनात

नांदेड जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढल्याने एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांना तैनात करण्यात आले आहे.  अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून,  वैद्यकीय मदत आणि अन्नपुरवठ्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ सतत संपर्कात

मुख्यमंत्री, कृषिमंत्री, सर्व पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात पाऊस ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 अत्याधुनिक यंत्रणेचा उपयोग

आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवामान, वाऱ्याची दिशा, पावसाचे प्रमाण आदींचा मागोवा घेतला जात आहे. दर तीन तासांनी नकाशा व माहिती अद्ययावत करून निर्णय प्रक्रियेस गती दिली जात आहे.

या आढावा बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या  अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, तसेच  इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांनी अफवांपासून दूर राहून, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केला.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Pune Crime: 'आमचा व्हिडीओ रेकॉर्ड करतो का?' गुरोळीत एकाला नग्न करून व्हिडीओ काढत कोयत्याने मारहाण; जीवे मारण्याची धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.