Haryana Shocking: हरियाणा : हरियाणा येथून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जिंद येथील चौधरी रणबीर सिंह विद्यापीठात विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. खरतरं हे मेसेज विद्यार्थीनींना विद्यापीठातील प्राध्यपकांनी (Professors) पाठवले आहे असा आरोप केला जात आहे. या प्रकरणी विद्यापीठावर आणि व्यवस्थेवर संताप व्यक्त केला जात आहे. Haryana Crime

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सांगितले की, २७ नोव्हेंबर रोजी त्यांना एक तक्रार मिळाली ज्यात लिहलं होत की, प्राध्यपकाने व्हॉट्रसअॅपद्वारे अश्लील मेसेज पाठवले. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. चौकशी समितीने याप्रकरणी चौकशी करावी नम्र विनंती. या प्रकरणी कुलगुरुंनी गांभीर्य लक्षात घेत पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यांची नोंद घेत चौकशी सुरु केली आहे. लवकरच अंतिम अहवाल सादर केला जाईल, असंही कुलगुरु डॉ. रामपाल सैनी यांनी सांगितले. या प्रकरणी तीन प्रोफेसरला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अश्लिल मेसेज व्हायरल
मेसेज मध्ये असं लिहलं होत की, सर्वांना वाटते की तू वर्जिन नाहीस’, ‘जर तुझ्या बॉयफ्रेडने परवानगी दिली नाही तर, तुला त्रास देऊ शकतो का?’, असं प्राध्यपकाने विचारलं. असे अनेक अश्लिल मेसेज प्रोफेसरने केले होते.
कॅम्पसमध्ये आंदोलने
या प्रकरणानंतर विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांचा संताप उसळला आहे. मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) च्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये जोरदार आंदोलन केली. त्यासोबत तिन्ही प्राध्यापकांचे पुतळे जाळले गेले. तसेच शिक्षकांविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, विद्यार्थिनींनी यापूर्वीही अनेक वेळा प्राध्यापकांच्या वर्तनाबद्दल तक्रारी केल्या होत्या, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. आता व्हॉट्सअॅपचे मेसेज समोर आल्यानंतरच प्रकरण गांभीर्याने घेतला पाहिजे. त्याच्यावर कठोर कारवाई करा.






