पुणे: हडपसर येथील (Hadapsar Money Scam) समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक (Hadapsar News) प्रशांत गवळी याने गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचे (Pune News) केलेले तीनही दावे खोटे ठरले आहेत. गवळी हा पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने त्याने वेळ मारून नेण्यासाठी गुंरावणूकदारांना आता जानेवारी महिन्याचा नवीन वायदा दिला आहे. त्याने गुंतवणूकदारांना पैसे कधी देणार? या मूळ प्रश्नाला बगल देत व्हिडीओच्या माध्यमातून सहानभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तसेच त्याने पोलीस अधिकारी, गुंतवणूकदार व पत्रकारांसह चिटफंड एजंटांना एक प्रकारे धमकी वजा इशारा दिला आहे. पुण्यात 5 हजार कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा होऊनही जिल्ह्यातील आमदार, खासदार अजूनही गप्प बसल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींना 40 ते 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांच्या भवितव्याकडे लक्ष देत नसल्याने ही एक दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. (Breaking News)

पुण्यासह राज्यातील 12 हून अधिक जिल्ह्यातील 40 ते 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदरांना 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून समर्थ क्रॉप केअरने आपल्या जाळ्यात ओढले आहे. संस्थाचालक व संचालकांनी 4 ते 5 हजार कोटी रुपयांची बेकायदा माया गोळा केली आहे. पुणे प्राईम न्युजने हा घोटाळा उघडकीस आणल्याने ही संस्था दिवाळखोरीत गेली आहे. संस्थेने मागील पाच महिन्यांपासून कोणत्याही गुंतवणूकदाराला एक छदामही दिलेला नाही. परंतु, काही दिवसांपासून संस्थाचालक प्रशांत गवळी व संचालक सुदामा दास, प्रकाश मांगने, नागनाथ जाधव, प्रकाश राठोड, ज्योतिबा काटकर, ओंकार कदम व चंद्रकांत राऊत हे सर्वजण फोन बंद करून पसार झाले आहेत. (Marathi News)
प्रशांत गवळी हा गायब झाल्यापासून त्याने फोन बंद केला आहे. परंतु, आता व्हिडीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांशी संपर्क साधत आहे. गवळी याने सांगितले की, हडपसर येथील चिटफंड एजंट व पोलीस अधिकाऱ्याने संगनमत करून 2 कोटी 25 लाख रुपये ब्लॅक मेल करून उकळले आहेत. त्यामुळे मला गुंतवणूकदारांचे 10 लाख रुपये देणे सुद्धा शक्य नाही. मी सेफ आहे. तर तुमचे पैसे सेफ आहेत. मी तुमच्या पैशासाठीच जुळवाजुळव करत आहे. मी पैसे जानेवारी महिन्यात देऊ शकतो. असे म्हणून प्रशांत गवळी यांनी वेळ मारून नेण्यासाठी गुंतवणूकदरांचे चौथ्यांदा तोंड बंद केले आहे.(Marathi Batmya)
दरम्यान, कोट्यवधी रुपयांचे व्यापारी साम्राज्य उभारणारे दादर येथील फिनफ्लुएन्सर अवधूत साठे यांची ट्रेडिंग अकादमी, ASTA, वर सेबीने कारवाई करून सुमारे 546 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. परंतु, हडपसर (पुणे) येथील समर्थ क्रॉप केअरचा आर्थिक घोटाळा हा अवधूत साठे यांच्या अकादमीपेक्षा 10 पटीने मोठा असताना देखील अद्यापपर्यंत सेबी, ईडी व आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नसल्याने गुंतवणूकदरांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार, खासदारसाहेब जरा इकडे लक्ष द्या
‘दैनिक पुणे प्राईम न्यूज’ने ‘समर्थ क्रॉप केअर’च्या बोगस करभाराबाबत सातत्याने आवाज उठविला आणि गुंतवणूकदारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर देखील संस्थेच्या कचाट्यात सापडलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांची सुटका करावी व संबंधित संस्थेवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, या प्रकराबाबत सत्ताधारी अजूनही मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून येत आहे. एरवी छोट्या -छोट्या गोष्टीसाठी आंदोलन करणारे विरोधी नेते कुठे गायब झाले आहेत? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे आमदार, खासदारसाहेब जरा इकडे लक्ष द्या. अशी म्हणण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.
कारवाई कधी होणार?
समर्थ क्रॉप केअर हा राज्यातील आर्थिक फसवणुकीचा मोठा घोटाळा होऊ शकतो. या घोटाळ्यामुळे 40 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. आजतागायत एकाही व्यक्तीला परतावा अथवा मुद्दल परत दिलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदरांची सहनशक्ती संपली असल्याने ते सातत्याने संस्थाचालक व एजंट लोकांच्या घरी हेलपाटे मारत आहेत. परंतु, ते सर्व गायब झाल्याने गुंतवणूकदारांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. त्यामुळे प्रशासन त्यांच्यावर कारवाई कधी करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.







