पुणे – लवकरच नोव्हेंबर महिना संपत असून ६ दिवसांनंतर डिसेंबर (२०२२) येणार आहे, अशा स्थितीत डिसेंबरमध्ये १३ दिवस बँक बंद राहणार आहे. हा आदेश आरबीआयने जारी केला आहे. डिसेंबरमध्ये ख्रिसमसचा सण देखील असतो ज्यामध्ये बँकेला नेहमीच सुट्टी असते. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यामुळे तुमची काही कामे बँकेत असतील तर ती वेळीच करून घ्या.
नव्या वर्षाचे स्वागत, ख्रिसमस तसेच इतर काही निमित्ताने डिसेंबर महिन्यात बँका बंद राहणार आहेत. डिसेंबर महिन्यात देशभरात बँका ह्या १३ दिवस बंद राहणार आहेत. तर महाराष्ट्रात ५ दिवस आणि गोव्यामध्ये ७ दिवस बँका बंद असतील.
भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर महिन्यासाठी बँक हॉलीडेची यादी सादर केली आहे. त्यानुसार दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवार आणि इतर सुट्ट्या मिळून मिळून एकूण १३ दिवस बँका बंद असलीत. त्यामुळे तुम्ही एखादे दिवस बँकेत गेलात आणि बँक बंद असेल तर मोठी अडचण येऊ शकते.
दरम्यान, बँकांचे सुट्ट्यांचे कॅलेंडर पाहिल्यास विविध राज्ये आणि शहरांमध्ये विविध तारखांना बँकांना सुट्टी असेल. तर बँकांना रविवारची, साप्ताहिक सुट्टी असेल. दरम्यान, नाताळही रविवारी आला आहे. बँकांच्या सुट्ट्या ह्या विविध राज्यांमधील सणावारांवर अवलंबून असतात.
डिसेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील याची माहिती पुढीलप्रमाणे
३ डिसेंबर – सेंट फ्रान्सिस झेवियरचा उत्सव (कनकदास जयंती/सेंट फ्रान्सिस झेवियरचा उत्सव) (पणजीमध्ये बँका बंद)
४ डिसेंबर -रविवार (साप्ताहिक सुट्टी) देशभरात बँका बंद
१० डिसेंबर -शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
११ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१२ डिसेंबर – पा-तगान नेंगमिंजा संगम – मेघालयात बँक बंद
१८ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१९ डिसेंबर – गोवा मुक्ती दिन – गोव्यात बँक बंद
२४ डिसेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार) ख्रिसमस सण (आयझॉलमधील बँका बंद)
२५ डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२६ डिसेंबर – ख्रिसमस, लासुंग, नामसंग – मिझोराम, सिक्कीम, मेघालय येथे बँक बंद
२९ डिसेंबर – गुरु गोविंद सिंग जी यांचा जन्मदिन – चंदीगडमध्ये बँक बंद
३० डिसेंबर – यू किआंग नोंगबाह (शिलॉंगमध्ये बँका बंद)
३१ डिसेंबर -नवीन वर्षांची संध्याकाळ (आयझॉलमध्ये बँका बंद)