BMC Election 2025: महाराष्टात आगामी निवडणूकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अगदी काही दिवसांवर नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणूका पार पडल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होतील असे चित्र आता दिसू लागले आहे. ( BMC Election 2025 Latest News )

राज्यभरात निवडणूकीची चर्चा रंगल्या असून नव्या आघाड्या आणि युतीचे प्रकरण समोर येऊ लागले आहे. मुंबई ठाणे आणि मुख्य शहरांत महापालिका निवडणुकांबाबत महत्त्त्वाची माहिती समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गटाची शिवसेना एकत्र लढणार, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु आहे. त्याचसोबत पुणे जिल्ह्यात राष्ट्रावादी कॉंग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी निवडणूका एकत्रित लढ्याव्यात अशी चर्चा देखील होत आहे.
या दिवशी आचार संहिता लागू
मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र घेण्याची शक्यता वर्तवली जात असून, येत्या काही आठवड्यांत महापालिका निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.







