पुणे: गँगस्टर आणि आंदेकर टोळीचा (Bandu Andekar) म्होरक्या बंडु आंदेकर याला भवानी पेठेतील (Pune Crime) जमिनीवर अतिक्रमण करुन त्यावर (Vanraj Andekar) बेकायदा बांधलेल्या इमारतीत (Ayush Komkar) भाडेकरु ठेवून त्यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने याप्रकरणात २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ आहे. (Breaking News)

खंडणीचा गुन्हा
याबाबत एका व्यावसायिकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०, रा. नाना पेठ), मनेष उर्फ मनोज चंद्रकांत वर्देकर (वय ५६, रा. कस्तुरे चौक, गुरुवार पेठ) यांच्याविरुद्ध खंडणी उकळणे, बेकायदा जमीन बळकावणे, अतिक्रमण करणे अशा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Latest Marathi News)
जीवे मारण्याची धमकी
फिर्यादी यांच्या जमिनीचा आंदेकर याने बेकायदेशीरपणे ताबा घेतला होता. त्यावर इमारत बांधून त्यात भाडेकरु ठेवले होते. विकसनासाठी जमिनीचा ताबा सोडण्यासाठी बंडू आंदेकर जमीन मालकाला धमकावत होता. त्याबदल्यात दोन दुकाने किंवा दीड कोटी रुपये, महापालिकेच्या कामासाठी ३० लाख रुपयांची खंडणी आंदेकरने मागितली होती. खंडणी न दिल्यास व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी त्याने दिल्याची फिर्याद व्यावसायिकाने दिली होती.
२६ डिसेंबरपर्यंत ‘पोलीस पाहुणचार’
आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर न्यायालयीन कोठडीत धुळे कारागृहात आहे. त्याला समर्थ पोलिसांनी धुळे कारागृहातून ताब्यात घेऊन विशेष न्यायालयात हजर केले. आंदेकरने भाड्यापोटी पाच कोटी ४० लाख रुपये खंडणी उकळली आहे. या पैशांचा वापर त्याने कसा केला, तसेच अन्य कोण लाभार्थी आहेत का?, त्याने अशा पद्धतीने आणखी कोणाला धमकावून जमीन बळकाविली आहे का? यादृष्टीने तपास करायचा आहे. आंदेकर याला पोलीस कोठडीत ठेवण्याची विनंती सरकारी वकील अनिल कुंभार यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने आंदेकरला शुक्रवार, २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.







