पुणे: गुन्हेगारी विश्वात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर (Bandu Andekar) याच्या घरावर (Pune Police) पुणे पोलिसांनी छापेमारी करत 22 लाख रुपये रोख रक्कम (Vanraj Andekar) आणि एक बंदूक जप्त केली आहे. पुणे (Pune Crime) महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू असताना ही छापेमारी करण्यात आली आहे. (Breaking News)

आंदेकर कुटुंबाची महापालिकेची तयारी
राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर रोजी पुण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आंदेकर कुटुंब पुणे महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक जमवा-जमव सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. (Latest Marathi News)
माहितीच्या आधारे छापेमारी
या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी आंदेकर यांच्या घरावर छापेमारी केली. या कारवाईत 22 लाख रुपये रोख रक्कम आणि एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम निवडणूक खर्चासाठी जमवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून जप्त केलेल्या रकमेचा आणि शस्त्राचा वापर कशासाठी होणार होता, याची चौकशी केली जात आहे. (Marathi News)
‘नैना’ क्षेत्रातील भूखंडासाठी 9 लाखांची मागणी; 6 लाखांची लाच घेताना बडा अधिकारी रंगेहात जाळ्यात
वकिलांचा पोलिसांशी वाद
दरम्यान, छापेमारीच्या वेळी बंडू आंदेकर यांचे वकीलही घरात उपस्थित होते. पोलिसांकडे घरझडतीची परवानगी आहे का, असा सवाल करत त्यांनी पोलिसांशी वाद घातला. या वादादरम्यान पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मिथुन चव्हाण आणि प्रशांत पवार या दोन वकिलांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबाचं राजकीय वर्चस्व
पुण्याच्या राजकीय पटलावर आंदेकर कुटुंबाचे अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे. कुटुंबातील काही सदस्य सध्या तुरुंगात असतानाही बंडू आंदेकर निवडणुकीच्या तयारीत सक्रिय असल्याची माहिती समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







