मुंबई: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आपल्या मंत्रिपदाचा (Manikrao Kokate Resign) राजीनामा दिल्याची माहिती (Breaking News) समोर आली आहे. राज्यपाल आचार्य (Ajit Pawar) देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा संदर्भ देत खातेबदलाच्या आदेशास मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिल्यानंतर या घडामोडी वेगाने घडल्या. (Maharashtra Politics)

‘सदनिका घोटाळा’ भोवला
सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. मंगळवारी, 16 डिसेंबर रोजी सत्र न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आज सकाळीच माणिकराव कोकाटे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या निकालानंतर विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात होती. (Latest Marathi News)
पुण्यात खळबळ! बंडू आंदेकरच्या अड्ड्यावर पोलिसांची ‘मिडनाईट’ धाड; २२ लाखांची रोकड अन् ‘गन’ जप्त
सुनावणीआधीच राजीनामा
माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार होती. मात्र त्याआधीच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेऊन ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वर्ग केली आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे सध्या बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभाग ही खाती अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्राला राज्यपालांनीही मंजुरी दिली आहे. (Marathi News)
अटक वॉरंट जारी
दरम्यान, सदनिका घोटाळा प्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात असून पुढील काळात माणिकराव कोकाटे यांना अटक कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






