आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. जिथे ३९ वर्षीय तरुणाने आपल्या ६५ वर्षीय वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार केला. या भयंकर कृत्यापूर्वी आरोपीने आपल्या आईला बेदम मारहाण केली आणि बलात्कार करताना म्हटले, ‘ही तुझ्या कर्माची शिक्षा आहे. ‘पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, मुलाला संशय होता की काही वर्षांपूर्वी माझे विवाहबाह्य संबंध होते.’, ज्यामुळे त्याने हे घृणास्पद कृत्य केले असल्याचे सांगितले.

ही घटना या महिन्याच्या सुरुवातीला घडली. आरोपीचे कुटुंब हज यात्रेवरून परतल्यानंतर मुलाने आईला मारहाण केली आणि बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनुसार, ती तिचा नवरा (निवृत्त सरकारी कर्मचारी), मुलगा आणि धाकटी मुलगी हौज काझी परिसरात राहतात. १ ऑगस्ट रोजी हज यात्रेवरून घरी परतल्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली, आणि आईशी बोलायचे आहे असं सांगत तिला एका खोलीत बंद केले आणि बलात्कार केला. ११ ऑगस्ट रोजी पुन्हा ३.३० वाजता त्याने दुसऱ्यांदा बलात्कार केला. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित महिलेने आपल्या २५ वर्षीय मुलीसोबत हौज काझी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेने आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे.







