Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील 54 वर्षीय शेतकऱ्याचा जागतिक ‘बॉडी बिल्डिंग’मध्ये डंका!

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 10 December 2025, 17:40

लोणी काळभोर (पुणे):  जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर वयाचा अडसर कधीच येत नाही. हे लोणी काळभोर (ता. हवेली) येथील 54 वर्षीय शेतकरी राजेंद्र परसराम गायकवाड यांनी सिद्ध करून दाखवले आहे. केवळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी गोवा येथे झालेल्या ‘आयसीएन नॅचरल स्पर्धा’ या  जागतिक स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून जागतिक पातळीवर इतिहास रचला आहे.  या कामगिरीबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.

 

आजारपणातून बॉडी बिल्डरपर्यंतचा प्रवास

राजेंद्र गायकवाड हे लोणी काळभोर येथील प्रगतशील शेतकरी आहेत. 1991 साली घरात दरोडा पडला तेव्हा झालेल्या मारहाणीत त्यांच्या कानाजवळील शीर ब्लॉक झाली होती. यामुळे त्यांना तब्बल 20 वर्षे तीव्र डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागला, ज्यासाठी त्यांना वेदनाशामक गोळ्या व बामची बाटली कायम सोबत ठेवावी लागत असे. पुढे 2010 पासून त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या व्याधींनी ग्रासले.

मित्रांसोबत दोन लाखांची पैज अन्…

सततच्या या आजारपणाला कंटाळलेल्या गायकवाड यांचा बॉडी बिल्डर होण्याचा प्रवास चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये एका चेष्टेतून सुरू झाला. थेऊर फाटा येथे मित्रांसोबत गप्पा मारताना एका मित्राने त्यांच्या शरीरावरून चेष्टा केली, ज्यामुळे गायकवाड दुखावले गेले. याच वेळी मित्रांनी त्यांच्यासोबत ‘बॉडी बिल्डर होऊन दाखव’ असे आव्हान देत  दोन लाखांची पैज लावली.

पैज जिंकण्याच्या जिद्दीतून ट्रेकिंग आणि जिमची सुरुवात

पैज जिंकण्याच्या जिद्दीतून गायकवाड यांनी लगेच त्यांचे मार्गदर्शक आणि माजी सरपंच सचिन तुपे  यांची भेट घेतली. तुपे यांच्यासोबत रामदरा डोंगर चढण्यास सुरुवात केली.  अयशस्वी ठरला, तेव्हा मित्रांनी पुन्हा डिवचले. मात्र, गायकवाड यांनी मनावर घेत एक महिन्याच्या कठोर सरावानंतर डोंगर चढण्यास सुरुवात केली.

2017 मध्ये 97 किलो वजन असताना त्यांनी ट्रेकिंग सुरू केली. 2018 मध्ये त्यांनी हडपसर येथे जिम जॉईन केली आणि 24 वर्षांचे प्रशिक्षक ओमकार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, चहा आणि हॉटेलमधील पदार्थ पूर्णपणे बंद करून त्यांनी स्वतःचा आहार तयार केला.

प्रारंभी ओमकार जगताप यांनी गायकवाड यांना ‘पन्नाशीत हे जमणार नाही,’ असे म्हणून हसले. मात्र, सचिन तुपे यांच्या आग्रहामुळे जगताप यांनी गायकवाड यांचा पूर्ण साडेतीन महिन्यांचा डाएट आणि वर्कआऊट प्लॅन तयार करून दिला. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर गायकवाड यांनी वजन नियंत्रित करत ‘अ‍ॅप्स’ मिळवले आणि ती दोन लाखांची पैज जिंकून दाखवली. आज तेच मित्र गायकवाड यांच्याकडून प्रेरणा घेऊन व्यायामाला लागले आहेत.

एका कॅटेगरीत सिल्वर तर दुसऱ्यात कांस्यपदक जिंकलं

प्रशिक्षणादरम्यान, सचिन तुपे यांचा मुलगा सिद्धांत तुपे यांनी गायकवाड यांना स्पर्धेविषयी माहिती दिली.  त्यानंतर  त्यांनी सलग तीन वर्षे  गोवा येथे झालेल्या जागतिक दर्जाच्या ‘आयसीएन नॅचरल स्पर्धा’  या शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी 2023  मध्ये पहिल्यांदा सहभाग घेत तृतीय क्रमांक मिळवला. 2024  मध्ये पुन्हा तृतीय क्रमांक पटकावला. आता 2025 मध्ये दोन वेगवेगळ्या कॅटेगरीत भाग घेऊन द्वितीय आणि तृतीय क्रमांक  पटकावला आहे. एका कॅटेगरीत त्यांनी सिल्वर मेडल तर दुसऱ्यात कांस्यपदक जिंकलं आहे.

राजेंद्र गायकवाड काय म्हणाले?

या यशाबद्दल बोलताना राजेंद्र गायकवाड म्हणाले की, “शारीरिक व्याधींमुळे मी ग्रासलो होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी वयाच्या  48 व्या वर्षी व्यायाम सुरू केला. सचिन तुपे यांचं सहकार्य आणि ओमकार जगताप यांनी योग्य मार्गदर्शन केले. व्यायामामुळे माझे शरीर सदृढ झाले असून, माझ्या बीपी आणि शुगरच्या गोळ्यादेखील बंद झाल्या आहेत. सकारात्मक मानसिकता निर्माण झाली आहे.”

गायकवाड यांनी तरुणांना आणि पालकांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. ते आजही जिम वर्कआऊटसह  लोणीकाळभोर येथील श्रीक्षेत्र रामदरा येथे नित्यनेमाने ट्रेकिंगला जात असतात.

बंधुराजही मागे नाहीत…

राजेंद्र गायकवाड यांचे बंधू संतोष गायकवाड यांनीही जैसलमेर ते लोंगेवाला, Border Run – The Hell Race ही 161 किमी ची स्पर्धा अवघ्या 28 तासांत यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या वाळवंटातील अल्ट्रा रनिंग चॅलेंजचे स्वप्न अखेर त्यांनी साकार केले.

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Next Post
Viral News: On the first night of the wedding, the groom told the terrible truth, saying, "I had sex.. What happened later...

Viral News: लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरदेवाने सांगितलं भयानक सत्य म्हणाला " मी शरीसंबंध.. नंतर जे घडलं ते...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.