Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

92 लाख शेतकऱ्यांचे 4,000 अडकले! नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 21 October 2026, 12:59

पुणे : राज्यात दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असतानाच, ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा 9 वा आणि 10 वा हफ्ता रखडला आहे यामुळे राज्यातील सुमारे 92 लाख पात्र शेतकऱ्यांचे लक्ष आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले असून, या दोन्ही हप्त्यांचे मिळून 4 हजार रुपये अद्याप लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत.

ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेला पूरक म्हणून ही योजना राबवली जात आहे. मात्र, पीएम किसान योजनेचे हप्ते मिळत असताना, नमो शेतकरी योजनेचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. या रखडलेल्या निधीसाठी शासनाकडे सुमारे 3700 कोटी रुपयांचा प्रस्ताव मार्च आणि जुलै महिन्यात पाठवण्यात आला आहे. परंतु, अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही आणि वितरणाची कोणतीही निश्चित कालमर्यादाही जाहीर करण्यात आलेली नाही.

दुष्काळाच्या परिस्थितीमुळे शेतीचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. अशा बिकट काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची आगाऊ मदत देण्याचे जाहीर केले आहे. ही मदत आणि नमो शेतकरी योजनेचे रखडलेले पैसे हे दोन्ही वेगळे लाभ असल्यामुळे, सरकारने दुष्काळी मदतीसोबतच 4 हजार रुपयांचे प्रलंबित हप्तेही एकत्र द्यावेत, अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

फक्त प्रस्तावांवर चर्चा करण्यापेक्षा किंवा कागदोपत्री घोषणा करण्यापेक्षा सरकारने तातडीने निधी मंजूर करून वितरणाचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आधार कार्ड आणि बँक खात्यांच्या तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांच्या पडताळणीचे काम बाकी असले, तरी वेळेत आर्थिक मदत मिळाल्यास अन्नदात्याला मोठा दिलासा मिळू शकेल.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फुरसुंगीत बांधकाम व्यवसायातील आर्थिक वादातून राडा ; महिलेला मारहाण करून केला विनयभंग, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल..

Wednesday, 21 October 2026, 13:27

92 लाख शेतकऱ्यांचे 4,000 अडकले! नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष…

Wednesday, 21 October 2026, 12:59

एमआयटी गुरुकुलच्या जलतरणपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत पदकांची लयलूट!

Wednesday, 21 October 2026, 12:20

मोठी बातमी! भाजपच्या युवा मोर्चात महाराष्ट्राचा दबदबा; 3 नेत्यांवर राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

Wednesday, 21 October 2026, 11:58

“हॉटेल बंद झालंय” म्हणताच 5 तरुणांचा संताप अनावर! जेवत्या ताटावरच मुळशीत धक्कादायक राडा,कामगारांसमोरच कृत्य..

Wednesday, 21 October 2026, 11:43

“मला कोपऱ्यात कुणी टाकलं?”; भाषणानंतर उपमुख्यमंत्री शिंदे आयोजकांवर संतापले!

Wednesday, 21 October 2026, 11:26
Next Post

फुरसुंगीत बांधकाम व्यवसायातील आर्थिक वादातून राडा ; महिलेला मारहाण करून केला विनयभंग, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp