तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत वैद्यकीय शिकाऊ उमेदवार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार.
– एकूण रिक्त पदे : 12 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : S.S.C, I.T.I.
– वयोमर्यादा : 18 – 32 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 5 फेब्रुवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2024
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.mahadiscom.in/ वरून माहिती घेता येणार आहे.