Horoscope Today 15 February 2026: आज 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवार महाशिवरात्रीचा मंगल दिवस असून वैदिक पंचांगानुसार आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. ग्रहांची स्थिती पाहता अनेक राशींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. काहींसाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे तर काहींना संयम राखण्याची गरज भासेल. भगवान शंकरांच्या कृपेने आजचा दिवस कसा जाईल, याबाबत राशीनिहाय अंदाज पुढीलप्रमाणे आहे.

मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी राहील. मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील.
वृषभ राशीच्या लोकांनी आज इतरांना मदत करताना स्वतःच्या कामांकडेही लक्ष द्यावे.
मिथुन राशीच्या लोकांना आज अनेक कामे एकाच वेळी करावी लागतील, मात्र प्रयत्नांना यश मिळू शकते.
कर्क राशीच्या लोकांची मते आज इतरांना पटतील आणि कुटुंबात मान-सन्मान वाढेल.
सिंह- राशीच्या लोकांनी आज कोणाच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नये.
कन्या राशीच्या लोकांनी आज नातेवाईकांशी वाद टाळलेले बरे.
तूळ राशीच्या लोकांनी कोणालाही पैसे उधार देण्यापासून दूर राहावे.
वृश्चिक राशीच्या लोकांनी बोलताना संयम ठेवावा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात.
धनु- राशीच्या लोकांसाठी आज खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेट सांभाळणे गरजेचे आहे.
मकर राशीच्या लोकांच्या विचार आणि कृतीत थोडी विसंगती जाणवू शकते.
कुंभ राशीच्या लोकांच्या घरात दुरुस्ती किंवा सजावटीसाठी खर्च होऊ शकतो.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास ठरेल. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश आणि कौतुक मिळेल.
एकूणच आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. योग्य निर्णय, संयम आणि सकारात्मक विचार केल्यास आजचा दिवस अधिक चांगला जाऊ शकतो.






