Horoscope Today 1 March 2026 : वैदिक पंचांगानुसार आज 1 मार्च 2026, रविवार आहे. ग्रहांच्या हालचालीमुळे आजचा दिवस काही राशींसाठी लाभदायक ठरू शकतो. सूर्याच्या प्रभावामुळे काम, कुटुंब आणि आरोग्य यावर परिणाम जाणवू शकतो. सर्व 12 राशींवर आजच्या ग्रहस्थितीचा काही ना काही प्रभाव दिसून येईल.

मेष राशीच्या लोकांनी आज वाहन चालवताना काळजी घ्यावी आणि बोलताना संयम ठेवावा.
वृषभ राशींसाठी दिवस चांगला असून लोकांकडून कौतुक मिळू शकते.
मिथुन राशीच्या व्यक्तींना कामात बदल करण्याची इच्छा होऊ शकते.
कर्क राशीच्या लोकांना निरीक्षणातून फायदा होईल.
सिंह राशींसाठी मेहनत घ्यावी लागेल पण त्याचे फळ मिळेल.
कन्या राशींसाठी कीर्तीचे योग आहेत तसेच घरातील काही कामासाठी खर्च होऊ शकतो.
तूळ राशीच्या लोकांनी नातेसंबंधात समजून घेण्याची भूमिका घ्यावी.
वृश्चिक राशीमध्ये कुटुंबात थोडे तणावाचे वातावरण राहू शकते.
धनु राशीच्या लोकांना संधी मिळेल पण मनात संभ्रम राहू शकतो.
मकर राशीच्या व्यक्तींना कलात्मक कामात संधी मिळेल.
कुंभ राशींसाठी विचार जास्त आणि कृती कमी अशी स्थिती राहू शकते.
मीन राशीच्या लोकांनी जोडीदाराशी शांतपणे संवाद साधावा.






