Friday, July 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daily Horoscope: गुरुवारचा शुभसंयोग! स्वामी समर्थांच्या कृपेने ‘या’ राशींना मोठा लाभ, तुमची रास काय सांगते?

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 9 July 2026, 7:41

Daily Horoscope: आज आषाढ कृष्ण पक्ष नवमी तिथी आणि गुरुवार आहे. आजचा दिवस अनेक राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, काही राशींसाठी आजचा दिवस शुभ तर काहींसाठी सावध राहण्याचा असणार आहे. जाणून घ्या, आजच्या ग्रहस्थितीचा तुमच्या राशीवर कसा परिणाम होईल.

१. मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी नवीन संधी घेऊन येईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज मार्गी लागतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होऊन नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आनंदाचे वातावरण राहील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरीत कामाच्या ताणामुळे येणारा तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. शिक्षणाशी संबंधित लोकांनी आज आपल्या कारकीर्दीवर अधिक लक्ष केंद्रित करावे. प्रेमजीवनात आज शुभता आणि यश मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. आज शिव उपासना करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. शुभ अंक 03 आणि 09, शुभ रंग लाल आणि पांढरा आहे.

 

२. वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार सुख आणि समाधान घेऊन येत आहे. प्रकल्पांमधील अडचणी दूर होतील आणि कामात गती येईल. राजकारणात सक्रिय असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. सरकारी कामे मार्गी लागतील आणि सरकारी अधिकार्यांशी संपर्क वाढल्यास भविष्यात फायदा होईल. नोकरीत पदोन्नतीचे योग दिसत आहेत. मात्र, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील वातावरणात आनंद राहील. कोणत्याही संकटाकडे न घाबरता शांतचित्ताने विचार करा. शुभ अंक 08 आणि शुभ रंग गडद हिरवा आहे.

३. मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या विस्तारासाठी खूप अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता असून नवीन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्वगुण दिसून येतील. भावनांपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व दिल्यास यश मिळेल. एखादी कठीण गोष्ट हसण्यावारी नेणे आज तुमच्यासाठी सोपे जाईल. दिवसभरात मानसिक शांतता लाभेल. कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनाला उभारी मिळेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कामातील सातत्य तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल.

४. कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. महिला वर्गाला त्यांच्या मैत्रीच्या व्यवहारातून फायदा मिळू शकतो. आज तुम्ही चाकोरीबाहेर जाऊन काही नवीन जबाबदारी स्वीकाराल. घरातील कामात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मुलांकडून एखादी दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा, जेणेकरून तुमचे काम सहज मार्गी लागेल.

५. सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी पूर्णपणे दृढनिश्चयी असाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि आर्थिक लाभामुळे मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि आदर वाढेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर आजचा प्रयत्न यशस्वी ठरू शकतो. नवीन शक्यता शोधण्याची ही उत्तम संधी आहे. तुमच्या पराक्रमाची सिद्धता दाखवण्याची संधी मिळेल. शुभ अंक 04 आणि शुभ रंग काळा आहे.

६. कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वैयक्तिक प्रगती आणि आत्मपरीक्षणाचा असेल. अधिकार्यांच्या सल्ल्याने काम केल्यास उत्तम फळ मिळेल. दूरच्या कामातून लाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी वर्गाला आर्थिक फायदा होईल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. नात्यांमध्ये संयम आणि गोडवा ठेवा. दिवसभरात नवीन योजना मनात येतील, त्यावर अंमलबजावणी करण्यास हरकत नाही. समोर आलेली संधी ओळखून निर्णय घेणे हिताचे ठरेल. संतुलित आहार आणि आरोग्याची काळजी घेणे आज महत्त्वाचे आहे. कोणाच्याही भुलथापांना बळी पडू नका.

७. तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कल्पकतेने विचार करण्याचा असेल. टीमवर्कमध्ये तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील आणि नेतृत्वामुळे सहकाऱ्यांचा विश्वास मिळेल. समोर आलेल्या संधीचा योग्य वापर करून तुम्ही मोठी मजल मारू शकता. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे कामाचा ताण कमी होईल. आर्थिक बाबतीत स्पष्टता ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबत काही आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आपल्या निर्णयावर ठाम राहा. दुपारनंतर मनातील अस्वस्थता कमी होऊन कामात एकाग्रता वाढेल.

८. वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आपल्या हक्कासाठी उभे राहण्याचा आहे. अनावश्यक खर्च टाळून बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारांत स्पष्टता ठेवा, अन्यथा गोंधळ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल, परंतु कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. वैयक्तिक आयुष्यात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु धैर्याने तुम्ही त्यातून बाहेर पडाल. वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा त्रास होऊ शकतो. संयम आणि शांतता बाळगणे हाच आजचा यशाचा मंत्र आहे.

९. धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा असेल. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवल्याने नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल. आज तुम्हाला नवीन मित्र जोडण्याची संधी मिळेल. दिवसभर आनंदाचे वातावरण राहील आणि करमणुकीच्या साधनांचा आनंद घ्याल. आर्थिक स्थिती स्थिर राहील, तरीही अनावश्यक खरेदी करणे टाळा. कामाच्या ठिकाणी काही नवीन प्रयोग करण्याची इच्छा होईल. इतरांच्या मतांचा आदर केल्याने तुम्हाला सन्मान मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक विचार तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकतात.

१०. मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाने काम करण्याचा आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. सुस्वभावी लोकांच्या संगतीत राहिल्याने नवीन गोष्टी शिकायला मिळतील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. आज घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका, शांत राहून काम केल्यास अपेक्षित यश नक्की मिळेल. आर्थिक बाबींमध्ये गुंतवणूक करताना घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे चांगले ठरेल. जुन्या मित्र-मैत्रिणींशी भेट होण्याची शक्यता आहे. दिवसभरातील कामाचा थकवा संध्याकाळी करमणुकीद्वारे दूर होईल.

११. कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर ठरणार आहे. स्थावर मालमत्तेशी संबंधित कामांतून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल आणि हितशत्रूंवर तुम्ही मात कराल. व्यवसायात नवीन संबंध प्रस्थापित होतील, ज्यातून भविष्यात मोठा आर्थिक लाभ होईल. तुमच्या यशाने विरोधक शांत होतील. केलेल्या कामाची योग्य पावती आज तुम्हाला मिळेल. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. मात्र, कोणाशीही वाद घालताना आपली भाषा संयमित ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या आणि सकस आहार घ्या.

१२. मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल, अन्यथा कामात अडचणी येऊ शकतात. बँकिंग आणि आर्थिक संबंधित कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीचे योग्य नियोजन करणे भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. बचतीसोबत गुंतवणुकीवर भर द्या. नात्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही घेतलेला एक छोटा निर्णय भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकतो. कोणाचेही ऐकून स्वतःचे मत बदलू नका. आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेचे भान ठेवा.

अस्वीकरण: दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रीय मान्यतेवर आधारित असून ती सामान्य माहिती आहे. कोणत्याही निर्णयापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या माहितीची सत्यता किंवा अचूकतेचा आम्ही दावा करत नाही.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! तावडेंच्या भेटीनंतर खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरे-खडसे भेटीत नेमकं काय शिजलं?

Friday, 10 July 2026, 19:30

पुण्यात हॉस्पिटलमध्येच गुंडाचा राडा! ‘तुला जीवे मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरलाच धमकी देत खंडणीची मागणी

Friday, 10 July 2026, 19:24

वारकऱ्यांच्या सेवेसाठी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा पुढाकार; आषाढी वारीत ११ हजार रेन प्रोटेक्टर्सचे मोफत वितरण

Friday, 10 July 2026, 19:19

शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम!कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा निर्णय, सभागृहात केली महत्त्वाची घोषणा

Friday, 10 July 2026, 19:12

रक्षक की भक्षक! PSIअन् कॉन्स्टेबलनेच केला तरुणीवर लैंगिक अत्याचार; पोलीस भरतीचं आमिष दाखवलं, विश्वास संपादन केला अन्…

Friday, 10 July 2026, 18:22

महिला डॉक्टरला मारहाण महागात! नगरसेवक रमेश म्हात्रेंना 4 दिवसांची पोलीस कोठडी

Friday, 10 July 2026, 18:13
Next Post

धुवाधार पावसाला ब्रेक! महाराष्ट्रात आता फक्त हलक्या सरींचा अंदाज; हवामान विभागाची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.