Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Drishyam 3 Trailer: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’चा ट्रेलर रिलीज; अक्षय खन्ना दिसणार का? चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय… 

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 23 December 2025, 11:24
Drishyam 3

पुणे प्राईम न्यूज डेस्क: अजय देवगनच्या (Ajay Devgn) सुपरहिट सस्पेन्स थ्रिलर ‘दृश्यम’ च्या तिसऱ्या भागाची घोषणा अखेर करण्यात आली असून, या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. याचा टीझर प्रदर्शित (Drishyam 3 Trailer) केला असून  विजय साळगांवकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचं वातावरण आहे. मात्र तिसऱ्या भागात अक्षय खन्ना (Akshay Khanna) दिसणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

 

‘आखिरी हिस्सा अभी बाकी है…’

मेकर्सनी ‘आखिरी हिस्सा अभी बाकी है…’ या ओळींसह 1 मिनिट 13 सेकंदांचा टीझर व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओमध्ये अजय देवगनचा प्रभावी आवाज ऐकायला मिळतो. विजय साळगांवकर आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना मागील दोन भागांतील घटनांचा संदर्भ देतो. “जग मला अनेक नावांनी ओळखतं, पण मला त्याचा फरक पडत नाही. मागील सात वर्षांत घडलेल्या घटनांनी मला हे शिकवलं की प्रत्येकाचं सत्य वेगळं असतं. माझं सत्य म्हणजे माझं कुटुंब,” असं तो सांगतो. यामधून विजय अजूनही आपल्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभा असल्याचं स्पष्ट होतं. व्हिडिओच्या शेवटी “कहाणी अजून संपलेली नाही… शेवटचा भाग अजून बाकी आहे” हे वाक्य प्रेक्षकांची उत्कंठा अधिक वाढवतं.

हेही वाचा: रणवीर सिंह अन् अक्षय खन्ना स्टारर ‘धुरंधर’ 500 कोटींच्या क्लबमध्ये; ‘या’ चित्रपटाचा विक्रम मोडीत

2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार

‘दृश्यम 3’ चं दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार असून हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांविषयी अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली, तरी कथा  ‘दृश्यम 2’ जिथे संपली होती तिथूनच पुढे सुरू होणार असल्याचं समजतं.

दरम्यान, तिसऱ्या भागात अक्षय खन्ना दिसणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मूळ मल्याळम कथेत नसलेला आयजी ऑफिसरचा रोल हिंदी आवृत्तीत समाविष्ट करण्यात आला होता आणि तो  ‘दृश्यम 2’ च्या यशामागील महत्त्वाचा घटक ठरला. दुसऱ्या भागातील अनपेक्षित क्लायमॅक्सने प्रेक्षकांचे सर्व अंदाज चुकीचे ठरवले होते. त्यामुळे तिसऱ्या भागात अक्षय खन्नाचं पात्र असेल की नाही, याबाबत सस्पेन्स कायम आहे.

‘दृश्यम’ हा सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं, तर 2022 मधील ‘दृश्यम 2’ नेही जोरदार कमाई केली. आता चार वर्षांनंतर तिसरा भाग येत आहे. विशेष म्हणजे मोहनलाल यांनी मल्याळम ‘दृश्यम 3’ चं शूटिंगही सुरू केलं असून, हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

मल्याळम ‘दृश्यम 3’  जर हिंदीत रिलीज झाला, तर त्याचा अजय देवगनच्या ‘दृश्यम 3’ च्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर काय परिणाम होईल, तसेच कथेत काही बदल असतील का, याबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र, विजय साळगांवकरची कहाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Next Post

पुण्यात भररस्त्यात राडा! बीजेएस कॉलेजबाहेर विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पाहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.