मुंबई: या वर्षातील सुपरहिट चित्रपट सैयारा मधील नवी स्टार जोडी अहान पांडे आणि अनिता पद्डा यांनी ऑनस्क्रीन निर्माण केलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. चित्रपटाच्या रिलीजपासूनच पडद्याबाहेरही दोघे रिलेशनशिपमध्ये (Ahaan Panday and Aneet Padda relationship) असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता, त्या अफवांना अधिक बळ मिळाले असून या जोडीबाबत चित्रपट निर्माते करण जोहर यांनी दिलेल्या विधानाने चर्चेला नवी दिशा मिळाली आहे. (Bollywood Latest news)

सानिया मिर्झाच्या पॉडकास्ट “सर्व्हिंग इट अप विथ सानिया” वर बोलताना करण जोहर यांनी अहान–अनिता जोडीला थेट “आयटी कपल” म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोघे खरोखरच डेटिंग करत असल्याची चर्चा होत आहे.
काय म्हणाला Karan Johar?
करण म्हणाला, “अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. ते खरंच डेट करत असतील की नाही, हे मला माहित नाही. पण…”. यानंतर नेटिझन्सचा असा विश्वास आहे की करणने एका अनौपचारिक चर्चेत या रिलेशनशिपची अप्रत्यक्ष पुष्टी दिली आहे.
चित्रपटातील त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर चाहत्यांकडूनही दोघांच्या वैयक्तिक नात्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे. करणच्या वक्तव्यामुळे आता चाहत्यांना या जोडीकडून ‘ऑफिशियल अनाउन्समेंट’ची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा: पिट्याभाईचा अखेर रामराम ! भाजपात केला प्रवेश, राज ठाकरेंची नाराजी ठरली कारण?







